महिला सफाई कामगाराला लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण

लातूर : ग्रामपंचायतीच्या महिला सफाई कामगाराला ग्रामपंचायतीत डांबून बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना लातूरच्या शिवनखेड येथे घटली आहे. पीडित सफाई कामगार महिलेने तिचा झाडू आणि टोपल्याचं नुकसान कुणी केलं असं विचारलं, यावरुन ग्रामपंचायतीत उपस्थित असलेल्या तिघांनी या महिलेला मारहाण करून रक्तबंबाळ केलं. गेल्या तीन दिवसांपासून या महिलेवर लातूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अहमदपूर तालुक्यातल्या शिवनखेड […]

महिला सफाई कामगाराला लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

लातूर : ग्रामपंचायतीच्या महिला सफाई कामगाराला ग्रामपंचायतीत डांबून बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना लातूरच्या शिवनखेड येथे घटली आहे. पीडित सफाई कामगार महिलेने तिचा झाडू आणि टोपल्याचं नुकसान कुणी केलं असं विचारलं, यावरुन ग्रामपंचायतीत उपस्थित असलेल्या तिघांनी या महिलेला मारहाण करून रक्तबंबाळ केलं. गेल्या तीन दिवसांपासून या महिलेवर लातूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अहमदपूर तालुक्यातल्या शिवनखेड इथल्या ग्रामपंचायतीत राजाबाई सोनकांबळे या गेल्या अनेक वर्षांपासून सफाई कामगार म्हणून काम करत आहेत. त्यासाठी लागणारे रस्ते-नाले साफ करण्याचं साहित्य त्या ग्रामपंचायतीतच ठेवतात. मात्र, कुणीतरी जाणून-बुजून त्यांचा झाडू आणि टोपले मोडून टाकले. त्यामुळे त्यांनी ग्रामपंचायतीत आलेल्या आणि त्यांच्याच गावातील असलेल्या गोट्या ठाकूर, अजित ठाकूर यांना जाब विचारला आहे. यावर चिडलेल्या गोट्या ठाकूर आणि इतर दोघांनी या महिलेला आम्हाला जाब विचारते का म्हणत, ग्रामपंचायतीचा दरवाजा आतून बंद करून लाठ्या-काठ्या आणि लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. यात राजाबाई गंभीर जखमी झाल्या.

राजाबाई यांना एकच मुलगा आहे. तोही रोजगारासाठी शहरात गेलेला आहे. त्यांच्या पतीचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं. त्यामुळे त्या रस्ते झाडून आणि नाले साफ करून मिळालेल्या पैश्यात उदरनिर्वाह करतात.

मारहाणीचा हा प्रकार घडत असताना कुणीही त्यांच्या मदतीला आलं नाही. पोलिसांनी आता घटनेची दखल घेत मारहाण आणि अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लवकरच आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.