Rajeev Masand | सुशांतच्या सिनेमांना कमी स्टार, चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांची चौकशी

| Updated on: Jul 21, 2020 | 1:21 PM

राजीव मसंद यांनी आपल्या समीक्षणात्मक शोमध्ये सुशांतच्या चित्रपटांबाबत अनेक वेळेला विरोधात भाष्य केल्याची माहिती आहे.

Rajeev Masand | सुशांतच्या सिनेमांना कमी स्टार, चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांची चौकशी
Follow us on

मुंबई : प्रख्यात चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांचीही सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात चौकशी करण्यात येत आहे. सुशांतच्या काही सिनेमांना मसंद यांनी कमी रेटिंग्ज दिल्याने ते पोलिसांच्या रडारवर आहेत. (Film critic Rajeev Masand inquiry in Sushant Singh Rajput Suicide Case)

राजीव मसंद यांनी आपल्या समीक्षणात्मक शोमध्ये सुशांतच्या चित्रपटांबाबत अनेक वेळेला विरोधात भाष्य केल्याची माहिती आहे. सुशांतच्या चित्रपटांना त्यांनी कमी स्टार दिले होते. याबाबत त्यांची वांद्रे पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

राजीव मसंद यांनी स्वतःला वाटलं म्हणून कमी स्टार दिले, की कोणाच्या सांगण्यावरुन सुशांतच्या चित्रपटाला कमी रेटिंग्ज दिले, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. सुशांतच्या विरोधात अनेक लेख आणि ब्लाइंड आर्टिकल (निनावी लेख) छापून आले होते. याबाबत हा तपास होणार आहे.

हेही वाचा : रिया चक्रवर्तीला अश्लील भाषेत धमकी, दोघा इन्स्टाग्राम युझर्सविरोधात गुन्हा

याआधी प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक आदित्य चोप्रा, संजय लीला भन्साळी यांचीही सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात चौकशी झाली आहे. सुशांतचे कुटुंबीय, कर्मचारी, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, ‘दिल बेचारा’ या सुशांतच्या अखेरच्या सिनेमाची सहनायिका संजना संघी अशा अनेक जणांची चौकशी सुरु आहे. (Film critic Rajeev Masand inquiry in Sushant Singh Rajput Suicide Case)

आदित्य चोप्रा यांची जवळपास 3 तास चौकशी झाली. सुशांत सिंहसोबत यशराज फिल्मसोबत केलेल्या करारांची आणि इतर व्यवहारांची माहिती घेण्यात आली. याशिवाय यशराज फिल्म्सवर झालेल्या आरोपांबाबतही विचारणा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

रिया चक्रवर्तीला इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोघा जणांनी अश्लील भाषेत धमकी दिली होती. तिने सांताक्रूझ पोलिसात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर दोघा इन्स्टाग्राम युझरविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला.

संबंधित बातम्या :

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी प्रसिद्ध निर्माते आदित्य चोप्रा यांची 3 तास कसून चौकशी

(Film critic Rajeev Masand inquiry in Sushant Singh Rajput Suicide Case)