Rhea Chakraborty | रिया चक्रवर्तीला अश्लील भाषेत धमकी, दोघा इन्स्टाग्राम युझर्सविरोधात गुन्हा

रिया चक्रवर्तीला इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोघा जणांनी अश्लील भाषेत धमकी दिली होती. त्यानंतर तिने सांताक्रूझ पोलिसात तक्रार नोंदवली होती

Rhea Chakraborty | रिया चक्रवर्तीला अश्लील भाषेत धमकी, दोघा इन्स्टाग्राम युझर्सविरोधात गुन्हा
Follow us
| Updated on: Jul 19, 2020 | 1:30 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला अश्लील मेसेज केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवत धमक्या येत असल्याबाबत रियाच्या तक्रारीनंतर सांताक्रूझ पोलिसांनी दोघा इन्स्टाग्राम युझर्सवर कारवाई केली. (Actress Rhea Chakraborty gets indecent threat message on instagram two account holders booked)

रिया चक्रवर्तीला इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोघा जणांनी अश्लील भाषेत धमकी दिली होती. त्यानंतर तिने सांताक्रूझ पोलिसात तक्रार नोंदवली होती. आता दोघा इन्स्टाग्राम युझरविरुद्ध एफआयआर नोंदवल्याची माहिती पोलिसांनी दिली.

“आपल्याला बलात्कार आणि हत्येच्या धमक्या देणाऱ्या व्यक्तींचा शोध घ्या, कारण सोशल मीडियावर सुशांतच्या आत्महत्येबद्दल आपल्याला दोष दिला जात आहे” अशी विनंती सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती हिने सायबर पोलिसांकडे केली होती. याआधीच तिने आपल्या इन्स्टाग्राम पेजवरुन कमेंट्स सेक्शन काढून टाकला आहे.

रियाने 16 जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश देण्याची विनंती केली होती. स्वत:ला प्रथमच तिने सुशांतची ‘गर्लफ्रेंड’ म्हणून सार्वजनिकरित्या संबोधले. “माझा सरकारवर पूर्ण विश्वास आहे. सीबीआय चौकशीमुळे त्याला न्याय मिळवण्यात मदत होईल” असं ती म्हणाली होती.

संबंधित बातम्या :

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी प्रसिद्ध निर्माते आदित्य चोप्रा यांची 3 तास कसून चौकशी

(Actress Rhea Chakraborty gets indecent threat message on instagram two account holders booked)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.