Ankita Lokhande | सुशांतच्या निधनाला एक महिना पूर्ण, अंकिता लोखंडेची इंस्टाग्राम पोस्ट

सुशांतच्या निधनानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेने आज पहिल्यांदाच इंस्टाग्रामवर पोस्ट केली.

Ankita Lokhande | सुशांतच्या निधनाला एक महिना पूर्ण, अंकिता लोखंडेची इंस्टाग्राम पोस्ट

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या अकाली निधनाने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. याच धक्क्यातून काहीशी सावरलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने सुशांतच्या एक्झिटला एक महिना झाला असताना इंस्टाग्रामवर पोस्ट टाकून श्रद्धांजली अर्पण केली. (Ankita Lokhande posts for the first time after demise of Sushant Singh Rajput )

वांद्र्यातील राहत्या घरी 34 वर्षीय सुशांतने 14 जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या दुर्दैवी घटनेला आज एक महिना झाला. सुशांतच्या निधनानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेने आज पहिल्यांदाच इंस्टाग्रामवर पोस्ट केली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

देवघरासमोर दिवा लावल्याचा फोटो अंकिताने शेअर केला आहे. दिव्याशेजारी पांढऱ्या रंगाची फुले दिसत आहेत. ‘चाईल्ड ऑफ गॉड’ (CHILD Of GOD) किंवा ‘देवाचे लेकरु’ अशा अर्थाचे कॅप्शन तिने दिले आहे. यामध्ये थेट सुशांतचा उल्लेख नसला, तरी ठीक एक महिन्याने त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ अंकिताने देवाजवळ दिवा लावून प्रार्थना केल्याचे म्हटले जात आहे.

 

View this post on Instagram

 

CHILD Of GOD 😇

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

सुशांतच्या निधनानंतर त्याचे वडील आणि बहिणींना भेटण्यासाठी अंकिता सुशांतच्या वांद्रे येथील निवासस्थानी गेली होती. अंकिता, तिची आई आणि जवळचा मित्र संदिप सिंगसोबत दिसली होती.

हेही वाचा : आधी 30 जणांचे खुले जबाब, आता मात्र पोलिसांकडून छुपी चौकशी

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनी जबाब नोंदवला आहे. शेखर कपूर यांनी ई-मेलच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना त्यांचा जबाब पाठवला.

शेखर कपूर यांचा जबाब खूपच धक्कादायक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुशांत सिंग राजपूतने तणावाखाली येऊन आत्महत्या केल्याचे म्हटलं जात आहे. त्या अनुषंगाने मुंबई पोलीस हा सगळा तपास करत आहेत. सुशांत सिंग राजपूत हा डिप्रेशनमध्ये कसा गेला याचा सर्व उलगडा शेखर कपूर यांच्या जबाबातून झाला आहे. (Ankita Lokhande posts for the first time after demise of  Sushant Singh Rajput)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *