Tips for Long Hair : चमकदार आणि लांब केस पाहिजेत? तर ‘या’ टिप्स नक्की फाॅलो करा, वाचा !

| Updated on: Jun 15, 2021 | 3:24 PM

सध्याच्या हंगामात आपल्या त्वचेची आणि केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण या हंगामात आपले केस आणि त्वचा चिकट होते. या हंगामात लोक त्वचेकडे विशेष लक्ष देतात. मात्र, केसांकडे दुर्लक्ष करतात.

Tips for Long Hair : चमकदार आणि लांब केस पाहिजेत? तर या टिप्स नक्की फाॅलो करा, वाचा !
सुंदर केस
Follow us on

मुंबई : सध्याच्या हंगामात आपल्या त्वचेची आणि केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण या हंगामात आपले केस आणि त्वचा चिकट होते. या हंगामात लोक त्वचेकडे विशेष लक्ष देतात. मात्र, केसांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे केस चिकड होतात आणि तुटतात. आज आम्ही तुम्हाला केसांची कशापध्दतीने काळजी घ्यावी हे सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे केस सुंदर आणि जाड होतील. (Follow these 5 tips to get long hair)

गरम तेलाची मालिश : वेळोवेळी टाळूला मॉइश्चराइझ करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी गरम तेलाची मालिश हा उत्तम मार्ग आहे. यामुळे केसांना ओलावाबरोबर पोषण आणि आवश्यक जीवनसत्त्वे मिळतात. यामुळे केस निरोगी होतात आणि त्यांची वाढ सुधारते. आठवड्यातून किमान दोनदा गरम तेलाची मालिश केसांना करा.

कंडीशनिंग : आठवड्यातून एकदा केसांची कंडीशनिंग करा. यासाठी आपण हेअर मास्क वापरू शकता. आपण घरी हेअर मास्क तयार करू शकतो. यासाठी केळी, मुलतानी माती, दोन चमचे मध, अर्धा वाटी दही आणि लिंबू घालून मास्क तयार करा आणि केसांना लावा. सुमारे एक तासांसाठी हा हेअर मास्क केसांवर ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा.

केस धुणे : कोरोना कालावधीमध्ये लोक घराबाहेर जाणे टाळत आहेत. अशा परिस्थितीत केसांना धूळ, माती आणि प्रदूषणाचा सामना करावा लागत नाही. म्हणून आठवड्यातून दोनदा केस धुणे पुरेसे आहे. जास्त धुण्यामुळे केसांचा ओलावा कमी होतो. जरी आपण दररोज घराबाहेर पडत असाल तरी देखील दररोज आपले केस धुणे टाळा आणि घराबाहेर पडताना आपले केस झाका.

हेल्दी फूड : जितके केसांची बाहेरून काळजी घेणे आवश्यक आहे तितकेच आतून पोषण मिळणे देखील आवश्यक आहे. आपल्या आहारात ओमेगा -3 फॅटी अॅसिडस्, बायोटिन आणि इतर आवश्यक जीवनसत्त्वे आणि पोषक घटक असलेले पदार्थ समाविष्ट करा. आहारात अंडी, बेरी, पालक, मासे, फ्लेक्ससीड, बदाम, गाजर, बीट इ. समाविष्ट करा.

नारळ तेल : केसांची लांबी वाढविण्यासाठी आपण रात्री नारळ तेलाने मेथी दाणे शिजवू ठेवा. त्यानंतर सकाळी उठून मेथी दाणे आणि तेल वेगळे करा आणि त्या तेलाने केसांच्या मुळांमध्ये मसाज करा. आठवड्यातून किमान 2 वेळा हे तेल लावावे. एका महिन्यात तुम्हाला फरक दिसेल.  स्ट्रेटनर किंवा कर्लरचा वापर टाळण्याचा प्रयत्न करा. कारण यामुळे आपले केस खराब होण्याची अधिक शक्यता असते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Snoring Issue | जाणून घ्या का उद्भवते घोरण्याची समस्या? ‘या’ सोप्या पद्धती वापरा आणि शांत झोपेचा आनंद घ्या…

Food | थंडीच्या दिवसांत आहारात ‘या’ गोष्टी समविष्ट करा आणि आजारांपासून दूर राहा!

(Follow these 5 tips to get long hair)