धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांनी केले मोठे गुपित उघड, म्हणाल्या, म्हणूनच…
बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. धर्मेंद्र यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. मात्र, आपल्या लाडक्या स्टारचे शेवटचे दर्शनही चाहत्यांना मिळाले नाही. देओल कुटुंबाकडून अत्यंत गुप्तता पाळण्यात आली.

बॉलिवूड अभिनेते आणि कोट्यावधी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे धर्मेंद्र यांचे निधन वयाच्या 89 व्या वर्षी झाले. धर्मेंद्र मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यानंतर त्यांना घरी शिफ्ट करण्यात आले आणि घरीच डॉक्टरांचे पथक उपचार केली जात होती. अनेक बॉलिवूड कलाकार धर्मेंद्र यांना बघण्यासाठी त्यांच्या घरीही पोहोचले. धर्मेंद्र यांचे निधन 24 नोव्हेंबर 2025 रोजी झाले. मात्र, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अत्यंत गुप्तता पाळण्यात आली. चाहत्यांना साधे त्यांचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही. दर्शनच काय तर शेवटचा फोटोही धर्मेंद्र यांचा कोणालाही बघता आला नाही. देओल कुटुंबाकडून प्रत्येक गोष्टीची गुप्तता पाळण्यात आली. यामुळे देओल कुटुंबाविरोधात लोकांमध्ये संतापाचे वातावरण बघायला मिळतंय.
धर्मेंद्र जरी तुमचे वडील असले तरीही आम्हीही त्यांचे चाहते आहोत, आयुष्यभर आम्ही त्यांच्यावर आणि त्यांच्या चित्रपटांवर प्रेम केले. धर्मेंद्र यांचे शेवटचे दर्शनही घेता आले नसल्याने लोक नाराज आहेत. धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर सनी देओल आणि बॉबी देओल यांनी अजूनही काही भाष्य केले नाहीये. अत्यंत गुप्तपणे सर्व विधी करताना देओल कुटुंबिय दिसत आहेत. मात्र, धर्मेंद्र यांच्या अत्यंदर्शनापासून सर्वांना नेमके दूर का ठेवले, यावर भाष्य करताना हेमा मालिनी दिसल्या आहेत.
हेमा मालिनी यांनी हमद अल रायमी यांना बोलताना अति दु:खाने म्हटले की, मला खरोखरच या गोष्टीचे प्रचंड वाईट वाटते की, त्यांचे चाहते त्यांना शेवटी बघू शकले पण नाहीत. त्यांची कधीच इच्छा नव्हती की, त्यांना लोकांनी कमकुवत बघावे.. यामुळे व्यक्तीच्या निधनानंतर कुटुंबाला शेवटी निर्णय घ्यावा लागतो. मात्र, आपल्याला पण याची खंत असल्याचे स्पष्ट शब्दात हेमा मालिनी यांनी म्हटले.
धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल कळताच अनेक चाहते स्मशानभूमीच्या बाहेरही पोहोचले. मात्र, तिथेही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चाहत्यांना आपल्या आवडत्या स्टारला साधा निरोपही देता आला नाही. तशी संधी देओल कुटुंबाकडून देण्यात आली नाही. मात्र, यामागील कारणही शेवटी हेमा मालिनी यांनी सांगितले.
