AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

शास्त्रज्ञांनी केलेल्या वेगवेगळ्या संशोधनात असे दिसून आले आहे की, ‘व्हिटामिन-डी’ची कमतरता असणाऱ्या लोकांना कोरोना काळात अधिक धोका असतो.

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक
घरात राहून व्हिटॅमिन डीची कमतरता कशी दूर कराल? जाणून घ्या याबद्दल सर्व काही
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Edited By: Anish Bendre | Updated on: Dec 07, 2020 | 12:28 PM
Share

मुंबई : कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य तज्ज्ञ याला कोरोना विषाणूची दुसरी लाट म्हणत आहेत. गेल्या काही दिवसांत कोव्हिड-19 प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस भयानक बनत चालली आहे. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी घरीच राहून आपला बचाव करणे महत्त्वाचे आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या वेगवेगळ्या संशोधनात असे दिसून आले आहे की, ‘व्हिटामिन-डी’ची (Vitamin D) कमतरता असणाऱ्या लोकांना कोरोना काळात अधिक धोका असतो. ‘व्हिटामिन-डी’मुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते. ज्यामुळे आपले शरीर कोणत्याही प्रकारच्या विषाणूंविरूद्ध लढण्यास तयार होते (Food Supplement for Vitamin D Deficiency).

वास्तविक आपले शरीर दररोज हजारो विषाणूंशी लढत असते, ज्यासाठी व्हिटामिन-डी आपल्याला मदत करते. अशा परिस्थितीत आपल्या शरीराला या व्हिटामिनची योग्य मात्रा मिळणे महत्त्वाचे असते. सहसा सूर्य प्रकाश आणि मांसाहारी पदार्थांमधून व्हिटामिन डी मिळते. परंतु, ज्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही त्यांच्यासाठी आहारात व्हिटामिन डीची कमतरता भरून काढणाऱ्या पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.

तर शरीरात असेल व्हिटामिन-डीची कमतरता…

1. जर आपल्याला सतत थकवा किंवा आजारी असल्यासारखे वाटत असेल तर, व्हिटामिन डीची कमतरता असून शकते. अशावेळी आपण वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी.

2. सतत सांधे दुखी, स्नायू दुखी किंवा अशक्तपणा, पायर्‍या चढताना पटकन थकल्यासारखे वाटणे देखील प्राथमिक लक्षण असू शकते.

3. व्हिटामिन-डीच्या कमतरतेमुळे केस देखील जास्त गळायला लागतात.

4. व्हिटामिन-डीची कमतरता असल्यास जखमा बऱ्या होण्यास देखील वेळ लागतो.

5. व्हिटामिन-डीच्या कमतरतेमुळे बऱ्याचदा आपल्याला नैराश्य देखील येऊ शकते.

(Food Supplement for Vitamin D Deficiency)

या पदार्थांचा आहारात करा समावेश

  1. मांस आणि भाजीपाला

मांसामध्ये व्हिटामिन-डी जास्त प्रमाणात आढळते. परंतु, आपण शाकाहारी असल्यास मशरूम आणि रताळे खाऊ शकता. यामुळे आपल्या शरीरात व्हिटामिन-डीची कमतरता भरून निघेल.

  1. संत्र्याचा रस

ताज्या संत्र्याचा अथवा फोर्टिफाइड संत्र्याचा रस व्हिटामिन डीची कमतरता भरून काढू शकतो. बाजारात टेट्रापॅकमध्ये मिळणारा संत्र्याचा रसही तुम्ही पिऊ शकता. संत्र्याच्या रसामुळे शरीराला 12 ते 15 टक्के व्हिटामिन-डी मिळते.

  1. अंड्यातील पिवळ बलक

अंडी आपल्या शरीराला व्हिटामिन-डी पुरवू शकतात. अंड्याच्या आतील पिवळा बलक अतिशय पौष्टिक आणि प्रथिनेयुक्त असतो. यातून शरीराला व्हिटामिन-डी मिळतो (Food Supplement for Vitamin D Deficiency).

  1. मासे

मांसाहारी लोकांसाठी ‘मासे’ हा व्हिटामिन-डीचा उत्तम स्त्रोत आहे. ‘साल्मन’, ‘टूना फिश’, ‘कॉड लिव्हर ऑइल’, ‘हेरिंग फिश’ इत्यादींमध्ये व्हिटामिन-डी मुबलक प्रमाणात आढळते.

  1. गायीचे दूध

आरोग्य तज्ञाच्या मते, गायीचे दूध व्हिटामिन-डीने समृद्ध असते. जे आपल्या शरीराला जवळपास 20 टक्के व्हिटामिन-डी देते.

  1. दही

दही खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन-डी देखील मिळते. म्हणूनच आहारात याचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून आपल्या शरीराला व्हिटामिन-डीची कमतरता भासणार नाही.

(Food Supplement for Vitamin D Deficiency)

टीप : सदर लेख संशोधनावर आधारित असून, कुठल्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Follow Us
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरे असं म्हणाले? धाराशिवमधील
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरेंच्या विधानाने सगळेच अवाक्; धाराशिवमधील नगरसेवकांच्या बैठकीत असं काय घडलं?
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452 कोटी रुपये... नेमकं काय घडलं?
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन;
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन; रिपब्लिकन पक्षात विलीन होण्याची मागणी
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या,
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या, शाळेत न जाण्याचा इशारा
ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत...
ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत म्हणाले, बहुसंख्य लोकांची ओढ...
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने मोठी खळबळ
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची टिप्पणी
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची महत्त्वाची टिप्पणी, सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं नाव, फुटीच्या वेळी पडद्याआड काय काय घडलं होतं?