मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांशी संवाद, 5 तास थांबून एक शब्दही बोलू दिला नाही!

वर्धा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.लोक संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. मात्र वर्ध्यातील शेतकऱ्यांसाठी हा विसंवादच ठरला. मकर संक्रांतीनिमित्त तीळगूळ घ्या गोड गोड बोला असं मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना म्हणाले, पण वर्ध्यातील शेतकऱ्यांना गोड नाही तर काहीच बोलू दिलं नाही. सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत शेतकऱ्यांना […]

मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांशी संवाद, 5 तास थांबून एक शब्दही बोलू दिला नाही!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

वर्धा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.लोक संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. मात्र वर्ध्यातील शेतकऱ्यांसाठी हा विसंवादच ठरला. मकर संक्रांतीनिमित्त तीळगूळ घ्या गोड गोड बोला असं मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना म्हणाले, पण वर्ध्यातील शेतकऱ्यांना गोड नाही तर काहीच बोलू दिलं नाही. सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधण्यासाठी बसवून ठेवलं, मात्र वर्ध्यातील एकाही शेतकऱ्याशी मुख्यमंत्री बोललेच नाहीत.

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसह वर्ध्यातही लोक संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ध्यातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार होते. त्यांच्या समस्यांबद्दल जाणून घेणार होते. यासाठी जिल्ह्यातील अनेक शेतकरी सकाळी दहा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पोहोचले होते. मात्र वर्ध्यात मुख्यमंत्र्याचा लाईव्ह कॉन्फरन्स कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी वर्ध्यातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाच नाही. मुख्यमंत्र्याकडे अपुरा वेळ असल्याचे कारण देण्यात आले. संवाद न झाल्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला.

सकाळी दहा वजाल्यापासून अनेक शेतकऱ्यांना थांबवून ठेवल्याने शेतकरी नाराज झाले, तर काहींनी संताप व्यक्त केला. यावेळी प्रत्येकजण आपली समस्या घेऊन येथे हजर राहिला होता. मात्र चार ते पाच तास बसवून ठेवल्यानंतरही मुख्यमंत्र्याशी संवाद न झाल्याने शेतकऱ्यांना दुपारी आपल्या घरी परतावे लगाले.

मुख्यमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडावी यासाठी गेल्या दोन वर्षात शेड नेट,पॉलिहाऊसमध्ये लाखो रुपयाचा तोटा सहन केलेल्या एका शेतकऱ्याने प्रयत्न केला. कृषी अधीक्षकाकडे व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये उपस्थित राहू देण्याची विनंती केली, मात्र कृषीअधीक्षकाने आठ दिवसानंतर अपॉइंटमेन्ट घेऊन भेटण्याचे फर्मान सोडले. तरीही समस्याग्रस्त दहा शेतकरी आपलं गाऱ्हाण मुख्यमंत्र्यांसमोर ठेण्यासाठी कॉन्फरन्स दरबारात पोहचले. मात्र तिथेही निराशाच हाती आली. वर्ध्यातील शेतकऱ्यांशी न बोलताच मुख्यमंत्र्यांनी संवादाला विराम दिला.

Non Stop LIVE Update
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.