AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

येरवडा जेलमधून सातारा जेलमध्ये पाठवलेल्या 4 कैद्यांना कोरोना, साताऱ्यातील रुग्णसंख्या 77 वर

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे (Four inmates report corona positive). विशेष म्हणजे आता कारागृहातील कैद्यांनादेखील कोरोनाची लागण होऊ लागली आहे.

येरवडा जेलमधून सातारा जेलमध्ये पाठवलेल्या 4 कैद्यांना कोरोना, साताऱ्यातील रुग्णसंख्या 77 वर
| Updated on: May 03, 2020 | 12:02 PM
Share

सातारा : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे (Four inmates report corona positive). विशेष म्हणजे आता कारागृहातील कैद्यांनादेखील कोरोनाची लागण होऊ लागली आहे. पुण्याच्या येरवडा कारागृहातून सातार्‍यातील कारागृहात पाठवलेल्या कैदींमधून 4 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कैंद्यांच्या संपर्कात आलेल्या 15 जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आलं असल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे (Four inmates report corona positive).

साताऱ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 77 वर पोहोचला आहे. या रुग्णांमध्ये पुणे येथील येरवडा कारागृहातून सातार्‍यातील कारागृहात पाठवलेल्या 46 कैद्यांपैकी 4 कैदी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे सातारा शहर पोलीस स्टेशनसह जिल्हा कारागृहात खळबळ उडाली आहे. जिल्हा कारागृहात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात एका कोरोनामुक्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे 6 वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फलटणमध्ये एकाच कुटुंबातील 3 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. फलटणमध्ये आतापर्यंत 4 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. परस्थिती नियंत्रणात यावी यासाठी प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे.

राज्यात कोरोनाचा कहर, बाधितांचा आकडा 12,296 वर

महाराष्ट्रात काल (2 मे) दिवसभरात 790 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 12 हजार 296 वर पोहोचली. याशिवाय राज्यात दिवसभरात 36 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर काल दिवसभरात 121 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं.

संबंधित बातम्या :

अकोल्यात 12 नवे कोरोनाग्रस्त, दोघींचे अहवाल मृत्यूनंतर पॉझिटिव्ह

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.