पूरग्रस्तांच्या डोळ्यात आसू, मंत्र्यांच्या चेहऱ्यावर हसू, बोटीत गिरीश महाजनांचा सेल्फी व्हिडीओ

| Updated on: Aug 09, 2019 | 11:49 AM

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा बोटीतील एक सेल्फी व्हिडीओ (Girish Mahajan Selfie video) व्हायरल झाला आहे.

पूरग्रस्तांच्या डोळ्यात आसू, मंत्र्यांच्या चेहऱ्यावर हसू, बोटीत गिरीश महाजनांचा सेल्फी व्हिडीओ
Follow us on

Girish Mahajan Selfie video कोल्हापूर : कोल्हापूर-सांगलीत महापुराने जगणं मुश्किल केल्याने लोकांच्या डोळ्यात आसू आहेत. मात्र राज्याचे मंत्र्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे. मंत्रीमहोदय बोटीतून मदत करण्यासाठी फिरत आहेत की पिकनिक करत आहेत असा प्रश्न आहे. कारण राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा बोटीतील एक सेल्फी व्हिडीओ (Girish Mahajan Selfie video) व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत गिरीश महाजन सेल्फीसाठी पोझ देताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे.

सांगलीत बोट दुर्घटनेत जवळपास 14 जणांचा मृत्यू झाला आहे. गिरीश महाजन हे कोल्हापुरातून सांगलीकडे निघाले होते. बोट दुर्घटना स्थळी जाताना गिरीश महाजन ज्या बोटीत होते, त्या बोटीत सेल्फी व्हिडीओ शूटिंग सुरु होतं. गिरीश महाजनांचे सहकारी व्हिडीओ शूट करत होते, त्यावेळी महाजन हे हात हलवून त्यांना पोझ देत होते.

गिरीश महाजन यांच्या या कृत्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीसांनी जवळचा मंत्री पाठवण्याऐवजी संवेदनशील मंत्री पाठवणं आवश्यक होतं, अशी टीका केली. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्तेचा अहंकार असलेल्या सरकारची असंवेदनशीलता दिसून येते असा हल्ला चढवला.

गिरीश महाजनांवर विरोधकांचं टीकास्त्र

सत्ताधारी नेते केवळ सोशल मीडियावर, प्रत्यक्ष जमिनीवर उतरुन काम नाही : जयंत पाटील

महाराष्ट्राच्या जनतेने व्हिडिओ पाहिलेला आहे, ते निर्णय घेतील : पृथ्वीराज चव्हाण

मंत्री गिरीश महाजन यांचा सेल्फी व्हिडीओ व्हायरल, पृथ्वीराज चव्हाण लाईव्ह – मुख्यमंत्र्यांनी विश्वासू मंत्र्यांना पाठवण्यापेक्षा गंभीर नेत्यांना पाठवायला हवं होतं

गिरीश महाजन यांची बॉडी लँग्वेज चुकीची, गंभीर मंत्र्याला पाठवलं असतं, तर बरं झालं असतं : पृथ्वीराज चव्हाण

सरकारला सत्ता, पैसा आणि यशाची मस्ती, सरकारच्या असंवेदनशीलतेचं आणखी एक उदाहरण, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची टीका

संबंधित बातम्या 

Kolhapur Flood | 2 लाख घरात वीज नाही, मोबाईल नेटवर्क गायब, हवाईमार्गे इंधन पुरवठ्याची तयारी