चित्रपटांचे अनुदान दीर्घकाळ प्रलंबित, नाट्यकर्मींसाठी शासनाच्या विविध विभागांचे एकत्र प्रयत्न गरजेचे : नीलम गोऱ्हे

| Updated on: Oct 19, 2020 | 11:39 PM

चित्रपटांचे अनुदान दीर्घकाळ प्रलंबित आहे. त्यामुळे नाट्यकर्मींसाठी शासनाच्या विविध विभागांचे एकत्र प्रयत्न गरजेचे असल्याचे मत विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी मांडलं.

चित्रपटांचे अनुदान दीर्घकाळ प्रलंबित, नाट्यकर्मींसाठी शासनाच्या विविध विभागांचे एकत्र प्रयत्न गरजेचे : नीलम गोऱ्हे
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील सिनेमांना अनुदाने एक वर्ष प्रलंबित असुन हे सर्व चित्रपट पाहुन त्यांच्या अनुदानाना मान्यता मिळण्यास अजुन 1 वर्षे लागु शकते म्हणुन यांच्या थकीत असलेल्या अनुदानाबाबत तसेच प्रलंबित असलेल्या कामाला चालना देण्यासाठी अतिरिक्त समिती स्थापन करा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांस्कृतिक विभागाला दिले. (Neelam Gorhe meeting With Artist And Cultural Department officer)

महाराष्ट्रातील सिनेकलावंत, रंगमंच कलावंत आणि लोककला कलावंत यांचे प्रश्न चित्रपटगृहातील सुविधा व शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत आज उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत वेबीनार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभिषण चौरे, सह संचालक मीनल जोगळेकर, अवर सचिव शैलेश जाधव, महत्त्वाचे प्रशासकिय अधिकारी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अनेक अभिनेते-अभिनेत्री वेबीनारच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी होते.

राज्यातील प्रत्येक महानगरपालिकेच्या अंतर्गत किती नाट्यगृह आहेत, त्याची सद्य:स्थिती काय आहे, त्यापैकी छोटी नाट्यगृहे किती आहेत, महिला कलाकारांना चेंजिंग रुम आहेत काय, यासगळ्या संबंधीचा अहवाल तयार करावा व तो मुख्यमंत्री आणि सांस्कृतीक कार्यमंत्री यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे, असं डॉ निलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितलं. तसंच पुणे, नाशिक, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, औरंगाबाद, जालना येथील महानगरपालिकेतील नाट्यगृहाच्या दुरुस्तीच्या कामामध्ये सुधारणा होत आहे याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं.

राज्यातील चित्रपटगृह सिनेकलावंत, रंगमंच कलावंत आणि लोककला कलावंत यांचे सर्वेक्षण चालू असून ते लवकर पुर्ण करण्यात येईल. महानगर पलिकेतील नाट्यगृहे, सिने कलावंत यांच्या अनुदानाबाबतचे काम अंतिम टप्प्‍यात असून त्यावर लवकर निर्णय होईल. कोल्हापूर चित्रनगरचे प्रस्तावित असलेले काम चालू आहे. ते काम लवकरच पूर्ण केले जाईल अशी आशा सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभिषण चौरे यांनी व्यक्त केली.

बालगंधर्व नाट्य मंदीर पुणे व औरंगाबाद येथील संत एकनाथ नाट्यमंदिर मधील दुरूस्तीच्या कामांचे टेंडर झालेले असून कामे तात्काळ सुरू करण्यात येत असल्याचं औरंगाबादच्या अतिरिक्त आयुक्तंनी सांगितलं.

नवीन नाट्यगृह बांधण्यासाठी व सर्व नाट्यगृहांमध्ये आवश्यक दुरूस्तीसाठी कलाकार व नाट्य निर्माता संस्थांची मदत घ्यावी. सर्व नाट्यगृहातील गैरसोईबद्दल तक्रार करण्यासाठी अधिकाऱ्यांचं नाव आणि मोबाईल नंबरची यादी नाट्यगृहाच्या दर्शनी भागात लावावी, दिव्यांगासाठी सर्व मनपांनी व्यवस्था करावी, असेही निर्देश डॉ गोऱ्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

(Neelam Gorhe meeting With Artist And Cultural Department officer)

संबंधित बातम्या

Amit Deshmukh | नाट्यप्रयोग पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली, अमित देशमुख रंगकर्मींना भेटणार

नाट्यगृह आता ‘रिंगटोनमुक्त’, मोबाईल जॅमर बसवण्याचा बीएमसीचा निर्णय