AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Food | थंडीतही शरीरासाठी लाभदायक, व्हिटामिन्सयुक्त मटार खाण्याचे ‘हिवाळी’ फायदे

मटारमध्ये व्हिटामिन ए, बी 1, बी 6, सी आणि के आढळतात. म्हणूनच मटारला व्हिटामिन आणि ऊर्जेचा उत्तम स्त्रोत अर्थात ‘पॉवरहाऊस’ देखील म्हटले जाते.

Food | थंडीतही शरीरासाठी लाभदायक, व्हिटामिन्सयुक्त मटार खाण्याचे ‘हिवाळी’ फायदे
| Edited By: | Updated on: Dec 07, 2020 | 12:28 PM
Share

मुंबई : थंडीचा मोसम सुरू झाला कि बाजारात हिरव्या वाटाण्याची अर्थात मटारची (Green Peas) आवक वाढू लागते. हिवाळ्यात मटारची चवदेखी आणखी वाढते. मटार एरव्हीही खाण्यासाठी चवदार असतात. केवळ चविष्ठच नाही, तर त्यात बरीच पोषक द्रव्ये देखील असतात. मटारमध्ये व्हिटामिन ए, बी 1, बी 6, सी आणि के आढळतात. म्हणूनच मटारला व्हिटामिन आणि ऊर्जेचा उत्तम स्त्रोत अर्थात ‘पॉवरहाऊस’ देखील म्हटले जाते (Health Benefits of Green Peas).

मटारमध्ये अत्यंत कमी कॅलरी असतात. तर, शरीरासाठी पोषक ठरणारे फायबर, प्रथिने, मॅंगनीज, लोह आणि फोलेट हे घटक भरपूर प्रमाणात आढळतात. हिवाळ्यात मटारची आवक वाढल्याने अनेकदा या दिवसांत बरेच मटारचे पदार्थ खायला मिळतात.

वजन कमी करण्यास प्रभावी

मटारचा वाटाणा वजन कमी करण्यासाठीचा सर्वोत्तम आहार मानला जातो. मटारमध्ये फायबर आणि प्रथिनांचे प्रमाण अधिक असल्यामुळे खाल्ल्यानंतर फार काळ भूक लागत नाही. परिणामी वजन नियंत्रित होण्यास मदत होते.

हृदयरोग दूर ठेवतो

मटारमध्ये आढळणारे मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम हृदय निरोगी ठेवते. मटार खाल्याने उच्च रक्तदाबाची समस्या कमी होते. मटार शरीरातून खराब कोलेस्ट्रॉल देखील कमी करते. मटारमध्ये आढळणारा अँटिऑक्सिडेंट देखील हृदयासाठी चांगला मानला जातो. (Health Benefits of Green Peas)

पचनासाठी फायदेशीर

फायबरने समृद्ध मटार पाचन तंत्रासाठी खूप चांगले मानले जातात. यामुळे शरीरातील चांगले बॅक्टेरिया वाढतात. ज्यामुळे आतडे योग्य प्रकारे कार्य करते. मटार खाल्ल्याने पोट व्यवस्थित साफ होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होत नाही.

मधुमेहामध्ये फायदेशीर

मटारमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो जो रक्तातील साखर नियंत्रित करतो. मटारमध्ये आढळणारे प्रोटीन आणि फायबरही रक्तातील साखर वाढू देत नाही. मटारमध्ये बी, ए, के आणि सी जीवनसत्त्वे असतात जे लोकांना मधुमेहाच्या जोखमीपासून सुरक्षित करतात.(Health Benefits of Green Peas)

हाडांसाठी आवश्यक

मजबूत हाडांसाठी व्हिटामिन के आवश्यक आहे. व्हिटामिन के ऑस्टिओपोरोसिसच्या समस्येपासून शरीराचे रक्षण करते. उकडलेल्या हिरव्या वाटाण्यामध्ये व्हिटामिन के-1 प्रमाण 46 टक्के इतके असते. ज्यामुळे हाडे मजबूत राखण्यास मदत होते.

त्वचेसाठी गुणकारी

मटारमध्ये आढळणारा व्हिटामिन सी कोलेजनच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतो. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार बनते. हिरव्या वाटाण्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स, कॅटेचिन, एपिक्टिन, कॅरोटीनोईड्स आणि अल्फा-कॅरोटीन असतात, जे अकाली वृद्धत्वाची लक्षणे (अँटाएजिंग) थोपवू शकतात. .

(Health Benefits of Green Peas)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.