MSBSHSE HSC Result 2019 mahresult.nic.in : बारावीचा निकाल 85.88 टक्के

| Updated on: May 28, 2019 | 12:12 PM

Maharashtra HSC Result 2019 पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल (Maharashtra Class 12th Board Results 2019) जाहीर झाला आहे. राज्यातील 85.88 टक्के विद्यार्थी बारावी परीक्षेत पास झाले आहेत. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली. तर कोकण विभाग पुन्हा अव्वल ठरला. मुलींचा निकाल 90.25 टक्के तर मुलांचा निकाल 82.40 टक्के इतका […]

MSBSHSE HSC Result 2019 mahresult.nic.in : बारावीचा निकाल 85.88 टक्के
Follow us on

Maharashtra HSC Result 2019 पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल (Maharashtra Class 12th Board Results 2019) जाहीर झाला आहे. राज्यातील 85.88 टक्के विद्यार्थी बारावी परीक्षेत पास झाले आहेत. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली. तर कोकण विभाग पुन्हा अव्वल ठरला. मुलींचा निकाल 90.25 टक्के तर मुलांचा निकाल 82.40 टक्के इतका आहे. कोकण विभाग 93.23 टक्क्यांसह अव्वल, तर नागपूर विभाग 82.51 टक्के निकालासह तळाला राहिला. विद्यार्थ्यांना आज दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येईल.  बोर्डाने आज पत्रकार परिषद घेऊन निकालाबाबतची माहिती दिली.

बारावीच्या निकालाची ठळक वैशिष्ट्ये

  • नऊ विभागीय मंडळात विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यवसाय अभ्यासक्रमाला एकूण 14 लाख 23 हजार 503 विद्यार्थी नोंदणी
  • यापैकी 14 लाख 21 हजार 936 परीक्षेला बसले तर 12 लाख 21 हजार 159 विद्यार्थी उत्तीर्ण
  • निकालाची टक्केवारी- 85 .88
  • 4470 मुलांना 90 टक्के पेक्षा जास्त मार्क
  • नऊ विभागीय मंडळातून सर्व शाखांत एकूण 68045 पुनपरीक्षार्थी नोंदणी त्यापैकी 67901 परीक्षा दिली त्यापैकी 18031 पास, एकूण टक्केवारी 26 .55 टक्के निकाल

विभागवार निकाल

  • कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 93.23 टक्के
  • नागपूरचा निकाल सर्वात कमी 82.05 टक्के
  • मुंबई विभागाचा निकाल 83.85
  • पुणे विभागाचा निकाल 87.88 टक्के
  • नाशिक विभागाचा निकाल 84.77 टक्के
  • कोल्हापूरचा निकाल 87.12
  • लातूर विभागाचा निकाल 86.08 टक्के
  • अमरावती 87.55 टक्के

शाखानिहाय निकाल

  • विज्ञान 92.07 टक्के
  • वाणिज्य 88.28 टक्के
  • कला – 76.45 टक्के

 

गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांमध्ये बारावी परीक्षेच्या निकालाची उत्सुकता पाहायला मिळत होती. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाने ठरवून दिलेल्या वेबसाईटवर जावे लागेल.

यावेबसाईटवर निकाल पाहता येणार 

  1. mahresult.nic.in
  2. hscresult.mkcl.org
  3. maharashtraeducation.com
  4. maharashtra12.jagranjosh.com

निकाल कसा पाहाल ?

  • निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.
  • त्यानंतर तुम्हाला HSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.
  • त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.
  • त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव रुपाली असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात  M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच RUP असे लिहावे लागेल.
  • यानंतर लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर पाहाता येईल
  • निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

एसएमएसवर निकाल

बीएसएनएल मोबाइलधारकांना एसएमएसवर निकाल पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना MHHSC <space> <seat no> असा एसएमएस टाईप करुन 57766  वर पाठवावा लागणार आहे. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल एसएमएस सेवेद्वारे पाठवला जाईल.