‘राफेल’ असते, तर परिणाम वेगळे असते : एअरफोर्स चीफ मार्शल

| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

नवी दिल्ली : वेळेवर राफेल मिळालं असतं, तर बालाकोट एअर स्ट्राईकचा परिणाम काही वेगळा असता, असा विश्वास एअरफोर्स चीफ मार्शल बिरेंद्र सिंह धानोआ यांनी व्यक्त केला. एरोस्पेस शक्ती आणि तंत्रज्ञानसंबंधी बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केलं. बालाकोट एअर स्ट्राईक ऑपरेशन बी. एस. धानोआ यांच्या नेतृत्त्वात पार पडलं होतं. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे […]

‘राफेल’ असते, तर परिणाम वेगळे असते : एअरफोर्स चीफ मार्शल
Follow us on

नवी दिल्ली : वेळेवर राफेल मिळालं असतं, तर बालाकोट एअर स्ट्राईकचा परिणाम काही वेगळा असता, असा विश्वास एअरफोर्स चीफ मार्शल बिरेंद्र सिंह धानोआ यांनी व्यक्त केला. एरोस्पेस शक्ती आणि तंत्रज्ञानसंबंधी बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केलं. बालाकोट एअर स्ट्राईक ऑपरेशन बी. एस. धानोआ यांच्या नेतृत्त्वात पार पडलं होतं. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर अवघ्या 12 दिवसात भारताने याचा बदला घेतला. भारतीय वायूसेनेने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

भारतीय वायुसेनेचे मार्शल स्वर्गीय अर्जन सिंग यांच्या जयंतिनिमित्त नवी दिल्लीच्या सुब्रतो पार्क येथे ‘2040 मधील एरोस्पेस पावर : तंत्रज्ञानाचा प्रभाव’ या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यात एअरफोर्स चीफ मार्शल बिरेंद्र सिंह धानोआ बोलत होते.

“बालाकोट ऑपरेशनवेळी आमच्याजवळ तंत्रज्ञान होतं आणि आम्ही अचूकपणे शस्त्रांचा वापर केला. आमच्याकडे मिग-21, बिसॉन आणि मिराज-2000 सारखी हायटेक विमानं आहेत. त्यामुळे आम्ही हे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडलं. मात्र, जर राफेल विमानांना वेळीच सेनेत समाविष्ट करण्यात आलं असतं, तर बालाकोट ऑपरेशनचा परिणाम आणखी चांगला असता”, असे बी. एस. धानोआ म्हणाले.

26 फेब्रुवारीच्या पहाटे भारताचा पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राईक

जैश-ए-मोहम्मदने 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानमध्ये घुसून एअरस्ट्राईक केला. भारताने पाकिस्तानच्या बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ उडवले. या एअरस्ट्राईकमध्ये मिराज-2000 विमानांचा वापर करण्यात आला होता.