पोलिसाला टिप्परने धडक देऊन पाडलं, रिव्हर्स घेऊन पुन्हा चिरडलं, अवैध रेती वाहतूकदाराचा हैदोस

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाने (Illegal sand transporter crushed police constable) पाठलाग करणाऱ्या पोलिसाला चिरडून ठार मारल्याची घटना बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे घडली आहे

पोलिसाला टिप्परने धडक देऊन पाडलं, रिव्हर्स घेऊन पुन्हा चिरडलं, अवैध रेती वाहतूकदाराचा हैदोस
Follow us
| Updated on: Apr 29, 2020 | 10:07 PM

बुलढाणा : अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाने (Illegal sand transporter crushed police constable) पाठलाग करणाऱ्या पोलिसाला चिरडून ठार मारल्याची घटना बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे घडली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी टिप्पर चालक आणि त्याच्या मालकासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे (Illegal sand transporter crushed police constable).

लॉकडाऊनदरम्यानही बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक सुरु आहे. पूर्णा नदी किनाऱ्याला लागून असलेल्या जळगाव, संग्रामपूर, शेगाव, नांदुरा तालुक्यातील गावांजवळ मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक सुरु आहे. विशेष म्हणजे वाळू माफिया दिवसाढवळ्या आणि रात्रभर चोरट्या मार्गाने अवैध रेती वाहतूक करत असल्याचं समोर आलं आहे.

शेगाव तालुक्यातील जलंब पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल उमेश शिरसाठ यांना आज सकाळी माटरगाव आणि भास्तन गावाजवळील पूर्णा नदीच्या काठातून एक विना नंबरचे टिप्पर अवैध रेती घेऊन खामगाव शहराकडे जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी तातडीने एका होमगार्डला सोबत घेतले आणि दुचाकीवरुन अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा पाठलाग केला.

कॉन्स्टेबल उमेश शिरसाठ यांनी भरधाव वेगाने जाणाऱ्या टिप्परचा पाठलाग करत आपली दुचाकी टिप्परच्या पुढे आडवी उभी केली. मात्र, टिप्पर चालक नराधमाने गाडी न थांबवता शिरसाट यांच्या दुचाकीला जोरदार धडक देत त्यांना चिरडलं. त्यामुळे शिरसाठ गंभीर जखमी झाले. टिप्पर चालक तेवढ्यावरच थांबला नाही. त्याने गाडी पुन्हा रिव्हर्स घेऊन शिरसाठ यांना पुन्हा चिरडलं. यात त्यांचा मृत्यू झाला. हा थरारक बघून शिरसाठ यांच्यासोबत आलेला होमगार्ड पळून गेला. तर टिप्पर चालक खामगावच्या दिशेला पसार झाला.

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळावर पोहचले. पोलीस दिवसभर टिप्परचा शोध घेत होते. या घटनेची माहिती इतर पोलीस स्टेशनला दिल्यानंतर जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तपास मोहीम सुरु केली.

पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर बेलाड, नवी येरळी परिसरात शोध मोहीम सुरु केली. यावेळी त्यांना टिप्पर आणि टिप्पर मालक सापडले. सुधाकर मिरगे असं टिप्पर मालकाचं नाव आहे. तर विशाल गवळी असं नराधम टिप्पर चालकाचं नाव आहे. या दोघांसह गोपाळ बेले, लक्ष्मण इंदोरे, श्रीकृष्ण मिरगे यांना अटक करुन त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

विशेष म्हणजे जलंब पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले आणि आज खून झालेले पोलीस कर्मचारी उमेश शिरसाठ यांचा 20 दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. आज त्यांच्या मूळगावी भादोला येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पोलीस अधीक्षकांसह इतरांनी श्रद्धांजली वाहिली.

संबंधित बातम्या :

दाटीवाटीच्या मालेगावात होम क्वारंटाईन अशक्य, संस्थात्मक क्वारंटाईन करणार : आरोग्य मंत्री

पुण्यात चिकनसाठी गर्दी, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पायदळी

राज्यातील शाळांची फी वाढ थांबवा, आशिष शेलारांचं शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.