AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona pandemic | राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा वाढ; संसर्ग रोखण्याचं आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान

राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. राज्यात दिवसभरात एकूण 5535 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर कोरोनामुळे दिवसभरात एकूण 154 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Corona pandemic | राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा वाढ; संसर्ग रोखण्याचं आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान
| Updated on: Nov 19, 2020 | 9:11 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. राज्यात दिवसभरात एकूण 5535 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर कोरोनामुळे दिवसभरात एकूण 154 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांमध्ये कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आल्याचे सांगितले जात होते. मात्र, राज्य सरकारने निर्बंध शिथील केल्यानंतर गर्दी वाढल्याने पुन्हा एकदा सक्रिय कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. (In Maharashtra corona patient increased, death ratio has also increased)

राज्यात आज दिवसभरात कोरोनाचे एकूण 5535 कोरोनाग्रस्त आढळले. तर दिवसभरात एकूण 154 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. कालच्या तुलनेत राज्यात आज दिवसभरात एकूण 500 रुग्ण जास्त आढळले आहेत. तर मृतांच्या आकड्यांतही लक्षणीय वाढ झाली आहे. आज दिवसभरात राज्यात एकूण 154 बाधितांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात राज्य़ात 5860 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नवे कोरोनाग्रस्त आढळण्याचे प्रमाण रुग्ण कोरोनामुक्त होण्याच्या तुलणेत कमी असले तरी, कालच्या तुलनेत नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आज मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढतोय असे म्हटले जात आहे.

राज्यात मुंबई, पुणे, अशा प्रमुख शहरांत कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिवसभरात नागपूरमध्ये 443 नव्या बाधितांची नोंद झाली. तर एकूण 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नाशिकमधील निफाडमध्येही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. निफाड तालुक्यात दिवसभरात 11 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. निफाडमध्ये एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 4069 वर गेला आहे.

अनलॉक अंतर्गत राज्यात सर्व व्यवहार सुरळीत करण्यात येत आहेत. यामध्ये राज्य सरकारने आतापर्यंत जीम, नाट्यगृहे, सिनेमागृहे, शाळा सुरु केल्या आहेत. पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व धर्मियांचे प्रार्थनास्थळंदेखील सुरु करण्याचार मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला. या सर्व निर्णयांमुळे एकीकडे जनजीवन पूर्वपदावर येत आहे. तर दुसरीकडे सर्व व्यवहार सुरळीत होत असल्याने सार्वजनिक स्थळांवर गर्दी वाढत आहे. परिणामी राज्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचे दिसत आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण लक्षणीयरीत्या वाढू लागले आहेत.

…तर कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते: मुख्यमंत्री

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही, असा इशारा देतानाच मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. दरम्यान, मुंबईसारख्या मोठ्या शहरात कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेशी सामना करण्यास आरोग्य प्रशासन तयारीला लागले आहे. सोलापूरसारख्या शहरात विनामास्क फिरल्यास दंड 100 रुपयांवरुन 500 रुपये करण्यात आला आहे. (In Maharashtra corona patient increased, death ratio has also increased)

संबंधित बातम्या :

दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता! मुंबई महापालिका प्रशासनाच्या तयारीचा आदित्य ठाकरेंकडून आढावा

दिलासादायक! मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढला, अडीचशेचा टप्पा पार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.