AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India China Face Off | भारत-चीन संघर्ष वाढला, भारतापुढे आता कोणते मार्ग?

गलवान खोरं हे भारत-चीन सीमेवरील लडाख सीमेजवळचा भाग आहे. हे खोरे चीनच्या दक्षिण शिनजियांग ते भारताच्या लडाखपर्यंत पसरलेले आहे (India China Face off at Galwan Valley Ladakh)

India China Face Off | भारत-चीन संघर्ष वाढला, भारतापुढे आता कोणते मार्ग?
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jun 17, 2020 | 9:23 AM
Share

नवी दिल्ली : चीनी सैन्यासोबत गलवानच्या खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाल्याचे दु:खद वृत्त आहे. शहीदांची संख्या वाढण्याची भीतीही वर्तवली जात आहे. संघर्षात चीनचेही 43 सैनिक मृत किंवा जखमी झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या प्रत्येक कुरापतीला सडेतोड उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. चीनसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतापुढे आता कोणते मार्ग असतील, हे पाहणं महत्त्वाचं आहे. (India China Face off at Galwan Valley Ladakh Update Reasons and Ways to Handle Indo China Border Tension)

भारतीय सैन्याने अधिकृत निवेदन जारी केल्यानंतर तासाभरातच चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी पत्रकार परिषद घेतली. सीमेवर दोन देशांच्या सैनिकांमधील चकमकीची सर्व जबाबदारी झाओ यांनी भारतावर टाकली. हे भारताचे प्रक्षोभक कृत्य असल्याचा कांगावाही चीनने केला. ‘भारताने सीमा ओलांडू नये किंवा परिस्थिती आणखी बिघडू शकेल असे एकतर्फी पाऊल उचलू नये’ अशी दर्पोक्तीही त्यांनी केली

गलवान खोरं हे भारत-चीन सीमेवरील लडाख सीमेजवळचा भाग आहे. हे खोरे चीनच्या दक्षिण शिनजियांग ते भारताच्या लडाखपर्यंत पसरलेले आहे

भारतापुढे आता कोणते मार्ग?

1. परराराष्ट्रमंत्र्यांच्या संयुक्त बैठकीत सहभागी न होणे

रशियाच्या पुढाकाराने 22 जून रोजी रशिया, भारत आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स बैठक आहे. बैठकीत सहभागी होणे टाळून भारत नाराजी दाखवू शकतो. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनविरोधातील भावनेचा लाभ घेण्यासाठी वातावरणनिर्मिती केली जाऊ शकते.

2. एलएसीवरील तणाव घटवणे

चीनशी राजनैतिक पातळीवर चर्चा सुरु ठेवणे, यामुळे एलएसीवर (प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर) दोन देशांमधील तणाव कमी केला जाऊ शकतो.

3. परराष्ट्र मंत्रालय स्तरावर चर्चा

सध्या सेनास्तरावर सीमेवर वाटाघाटी सुरु आहेत. आता परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून मुत्सदी चर्चा होऊ शकते. तशी चर्चा झाली तर मार्ग लवकर सापडेल.

चीनच्या घुसखोरीची संभाव्य कारणे 1. कोरोनामुळे जगभरातून वाढलेला ताण, कारवायांना भारत पाठिंबा देत असल्याचा राग 2. हाँगकाँग संघर्ष, रुतलेल्या अर्थव्यवस्थेवर लक्ष हटवण्याचा प्रयत्न 3. भारताने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवले 4. भारताच्या परराष्ट्र आणि आर्थिक धोरणामध्ये बदल

भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीत चिनी सैन्याच्या गोळीबारात भारताचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाल्याची माहिती दुपारी समोर आली होती. त्यानंतर राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग आला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत, तिन्ही दलांचे प्रमुख आणि परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांच्यासमवेत बैठक घेतली. राजनाथ सिंह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली.

45 वर्षांनी शांतता कराराचा चीनकडून भंग

1993 च्या सीमेवरील शांतता कराराचा चीनकडून भंग करण्यात आला आहे. भारत-चीन सीमेवर 1975 नंतर प्रथमच असा गोळीबार होऊन सैनिक शहीद झाल्याची घटना घडली आहे. 1975 मध्ये भारताचे 4 जवान शहीद झाले होते. 1975 ला अरुणाचल प्रदेशात संघर्ष उफाळला होता.

गलवान खोरं हे भारत-चीन सीमेवरील लडाख सीमेजवळचा भाग आहे. यावरुनच चीनच्या कुरापती वाढल्या आहेत. संपूर्ण जग कोरोनामुळे चीनच्या विरोधात उभा आहे. अशा परिस्थितीत कोरोनावरुन लक्ष हटवण्यासाठी चीन अशाप्रकारच्या कुरापती करत आहे, असं संरक्षक तज्ज्ञांचं मत आहे.

सीमावाद सोडवण्यासाठी भारत -चीनमध्ये 5 करार

  • 1993 – प्रत्यक्ष ताबा रेषेच्या भागात शांतता राखण्याचा करार
  • 1996 – प्रत्यक्ष ताबा रेषेच्या भागात लष्करीदृष्ट्या विश्वासदृढतेचे प्रयत्न करण्याचा करार
  • 2005- प्रत्यक्ष ताबा रेषेच्या भागात लष्करीदृष्ट्या विश्वासदृढतेचा करार अंमलात आणण्यासाठी प्रोटोकॉल निश्चित
  • 2012- सीमेसंबंधीच्या मुद्यावर चर्चा व समन्वयासाठी यंत्रणेची स्थापना करार
  • 2013 – सीमा संरक्षण सहकार्य करार

गलवान खोरे क्षेत्र महत्त्वपूर्ण का आहे?

“गलवान खोरे क्षेत्र भारताच्या दृष्टीने अंत्यंत महत्त्वाचे आहे. कारण हे खोरे पाकिस्तान, चीनचे शिनजियांग आणि भारताच्या लडाख सीमा रेषेभागात पसरले आहे. 1962 साली भारत-चीन युद्धात हे क्षेत्र केंद्रस्थानी होतं”, असं जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे माजी प्रोफेसर आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक एसडी मुनी यांनी ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

संबंधित बातम्या :

Galwan Valley conflict | भारत-चीनमध्ये गलवान खोऱ्यांवरुन नेमका तणाव काय?

India-China Territory Dispute | भारत-चीन नेमका सीमा-वाद काय?

(India China Face off at Galwan Valley Ladakh Update Reasons and Ways to Handle Indo China Border Tension)

Follow Us
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची...
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची उमेदवारी; बिनविरोध निवड होताच केलं मोठं विधान
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा; म्हणाले, आजचं फोडाफोडीचं...