AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : 3rd T20 साठी टीम इंडियात दिसू शकतो मोठा बदल, टॉप प्लेयरला बसणार धक्का

IND vs NZ : दुसऱ्या टी 20 सामन्यात 100 धावांच सोप लक्ष्य असतानाही, विजयासाठी इतका संघर्ष करावा लागला. त्यामुळे जिंकलो असलो, तरी टीम इंडियाची चिंता वाढली आहे.

IND vs NZ : 3rd T20 साठी टीम इंडियात दिसू शकतो मोठा बदल, टॉप प्लेयरला बसणार धक्का
| Updated on: Jan 30, 2023 | 12:47 PM
Share

IND vs NZ 3rd T20 : वनडे सीरीजमध्ये टीम इंडियाने क्लीन स्वीप केलं. पण T20 सीरीजमध्ये टीम इंडियाला तोच कित्ता गिरवता आला नाही. T20 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया अडखळतेय. पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. काल दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने एक चेंडू राखून विजय मिळवला. महत्त्वाच म्हणजे दुसऱ्या टी 20 सामन्यात 100 धावांच सोप लक्ष्य असतानाही, विजयासाठी इतका संघर्ष करावा लागला. त्यामुळे जिंकलो असलो, तरी टीम इंडियाची चिंता वाढली आहे. टीम इंडियाची ओपनिंग जोडी सातत्याने अपयशी ठरतेय. कॅप्टन हार्दिक पंड्याने खराब विकेट्सना जबाबदार धरलय. पण खराब विकेट्सचा मुद्दा बाजूला ठेवला, तर टीम इंडियाला दोन्ही सामन्यात अपेक्षित सुरुवात मिळाली नाही.

एकाला ड्रॉप करण्याची गरज

वनडेमध्ये प्रचंड यशस्वी ठरलेला शुभमन गिल टी 20 तोच कित्ता गिरवू शकलेला नाही. टी 20 मध्ये तो मोठी खेळी करु शकलेला नाही. इशान किशनचही तेच आहे. इशान किशनने सुद्धा वनडेच्या यशाची टी 20 मध्ये पुनरावृत्ती केलेली नाही. त्यामुळे दोघांपैकी एकाला ड्रॉप करण्याची गरज आहे.

चहल की कुलदीप?

मुंबईकर पृथ्वी शॉ संधीच्या प्रतिक्षेत आहे. रणजीमध्ये जबरदस्त प्रदर्शन केल्यामुळे पृथ्वी शॉ ला T20 टीममध्ये संधी मिळाली आहे. जवळपास दीड वर्षापूर्वी तो टीम इंडियाकडून शेवटचा सामना खेळला होता. त्यामुळे तिसऱ्या टी 20 सामन्यात पृथ्वी शॉ ला संधी मिळू शकते. कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्यापैकी कोणाला संधी द्यायची? त्याबाबतही निर्णय होऊ शकतो. पावरप्लेमध्ये हिटिंग करण्याची क्षमता

लखनौ येथील सामन्याच टीम इंडियाने चार स्पिनर्स खेळवले. यात दोन पूर्णवेळ फिरकी गोलंदाज होते. अहमदाबादच्या खेळपट्टीनुसार, टीम इंडियात काही बदल होऊ शकतात. वनडेमध्ये डबल सेंच्युरी झळकवणाऱ्या शुभमन गिलची T20 मध्ये 15.20 ची सरासरी आहे. पावरप्लेमध्ये धावा निघत नाहीयत. धावा न येण्याला काही प्रमाणात खेळपट्टीची सुद्धा भूमिका आहे. पृथ्वी शॉ च्या समावेशाने इनिंगला गती मिळू शकते. तो पावरप्लेमध्ये 152.30 च्या स्ट्राइक रेटने फटकेबाजी करतो.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.