नाशिकमध्ये देशी लग्नाचा विदेशी बार

लग्न म्हटले की प्रत्येकाच्या आयुष्यातील हा आनंदाचा दिवस मानला जातो. आज मोठ्या प्रमाणात प्रेमविवाह (indian boy marriage with foreign girl) होत आहेत.

नाशिकमध्ये देशी लग्नाचा विदेशी बार

नाशिक : लग्न म्हटले की प्रत्येकाच्या आयुष्यातील हा आनंदाचा दिवस मानला जातो. आज मोठ्या प्रमाणात प्रेमविवाह (indian boy marriage with foreign girl) होत आहेत. यामध्ये तर आता सातासंमुद्रापारही मुला-मुलींचे लग्न ठरत आहेत. नुकतेच भारतातील एका मुलाने अमेरिकेतील मुलीसोबत लग्न केलं आहे. आतापर्यंत भारतातील अनेक मुला-मुलींनी परदेशी मुला-मुलींसोबत लग्न (indian boy marriage with foreign girl) केलं आहे.

नाशिकमधील पंचवटी परिसरातील आठवण लॉन्समध्ये आज (30 नोव्हेंबर) एक आगळा वेगळा विवाहसोहळा पार पडला. अमेरिकेत राहणाऱ्या अलोव्हिया आणि धुळे जिल्ह्यात राहणारा राहुल पवार विवाह बंधनात अडकले. चक्क अमेरिकेतील अलोव्हियाने भारतात येऊन हिंदू पद्धतीने विवाह करुन आपला साथीदार राहुल बरोबर पुढील आयुष्याची वाटचाल सुरु केली आहे.

राहुल गेल्या काहीवर्षांपासून अमेरिकेत नोकरी करत आहे. याच ठिकाणी त्याला अलोव्हिया भेटली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि मौत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी विवाह करण्याचे ठरवले. अमेरिकेत त्यांनी त्या ठिकाणच्या परंपरेनुसार आपला विवाह सोहळा आटोपला. पण राहुलच्या कुटुंबीयांना भारतीय संस्कृतीनुसार विवाहसोहळा करायचे असल्यामुळे भारतातही विवाह करण्यात आला. यावेळी अलोव्हियाचे आई, वडील आणि इतर नातेवाईकही उपस्थित होते.

विशेष म्हणजे अलोव्हियानेही अगदी आनंदात भारतीय परंपरेनुसार पूजा केली. हा संपूर्ण विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. येथील संस्कृती बघून खरच आनंद वाटतो अशा भावनाही वधूने व्यक्त केल्या.

Published On - 4:00 pm, Sat, 30 November 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI