दुबईत भारतीयाचं नशीब फळफळलं, बिग तिकिट ‘ड्रॉ’मध्ये तब्बल 24 कोटी रुपये जिंकले

| Updated on: Dec 05, 2020 | 1:31 AM

कुणाचं नशीब कधी साथ देईल हे काही सांगता येत नाही. दुबईमध्ये असंच एक उदाहरण पाहायला मिळालं. दुबईतील भारतीय जॉर्ज जॅकब्ससोबत असा काही प्रसंग घडला.

दुबईत भारतीयाचं नशीब फळफळलं, बिग तिकिट ड्रॉमध्ये तब्बल 24 कोटी रुपये जिंकले
Follow us on

दुबई : कुणाचं नशीब कधी साथ देईल हे काही सांगता येत नाही. दुबईमध्ये असंच एक उदाहरण पाहायला मिळालं. दुबईतील भारतीय जॉर्ज जॅकब्ससोबत असा काही प्रसंग घडला ज्याची कल्पना एखादा सामान्य माणूस केवळ स्वप्नातच करु शकतो. 51 वर्षीय जॉर्ज यांना दुबईत अचानक 24 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. जॉर्जने 30 नोव्हेंबर रोजी 222 सीरीजमधून लॉटरी तिकिट खरेदी केलं होतं. याच्या मेगा ड्रॉमध्ये मेगा जॉर्ज यांना 32 लाख 67 हजार 102 डॉलर म्हणजेच 24 कोटी लाख 9 लाख 91 हजार 734 रुपये मिळाले आहे (Indian businessman in Dubai won a USD 3 million in a raffle draw).

अगदी अचानकपणे मेगा ड्रॉ जिंकणारे जॉर्ज जॅकब्स म्हणाले, “मी मागील 2 वर्षांपासून प्रत्येक महिन्यात तिकिट खरेदी करत आहे. मला आज विश्वास बसत नाही की मी खरोखर हा मेगा डॉ जिंकलो आहे. हा ड्रॉ जिंकणं मला स्वप्न वाटत आहे.”

जेव्हा हा मेगा ड्रॉ जिंकल्याचं समलजं तेव्हा मी गाडी चालवत होतो. ही बातमी ऐकल्यावर मी हे खरं आहे की खोटं हे तपासण्यासाठी गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. तरीही माझा विश्वास बसत नव्हता.

जॅकब्सने नुकताच दुबईत वैद्यकीय साहित्य विकण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. त्यांचं दुबईत एक छोटंसं दुकान आहे. इतकी मोठी रक्कम जिंकल्यानंतर ते खूपच भावूक झाल्याचं पाहायला मिळाले. ते म्हणाले, “मी या ड्रॉच्या पैशातून माझ्या मुलांचं भविष्य चांगलं करेल.” जॅकब्स यांची मुलगी 24 वर्षांची आहे. तर त्यांचा मुलगा दुबईतील इंडियन हायस्कूलमध्ये 12 वी इयत्तेत शिकत आहे.

बिग तिकिट आयोजकांनी म्हटलं, “लाईव्ह ड्रॉ 3 जानेवारीला सायंकाळी 7.30 वाजता होणार आहे. यात जॅकब्स यांना पहिल्या टप्प्यात 1 मिलियन डॉलर म्हणजेच 73.7 लाख रुपये दिले जातील. त्यानंतर काही दिवसांनंतर उर्वरित संपूर्ण रक्कम मिळेल.

हा मोगा ड्रॉ जिंकणाऱ्यांमध्ये जॅकब्स यांच्याशिवाय अविनाश कुमार यांचाही समावेश आहे. त्यांना 3.68 कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं आहे. तसेच सिद्दीक अब्दुल कादर यांनी 73.7 लाख रुपये जिंकले आहे. सुनील कुमार यांना 60 लाख रुपये, तर शोएब अख्तर यांना 45 लाख रुपये मिळाले आहेत. हे सर्व भारतीयवंशाचे आहेत.

संबंधित बातम्या :

कर्जबाजारी शेतकऱ्याला दुबईत 28.5 कोटींची लॉटरी

कचऱ्यात टाकलेल्या लॉटरीच्या तिकिटाने भाजीविक्रेता कोट्याधीश

नवी मुंबईतील ‘सिडको’च्या लॉटरीचा मुहूर्त ठरला!

Indian businessman in Dubai won a USD 3 million in a raffle draw