जॉन्सन बेबी पावडरने बाळाला कॅन्सरची भीती, सॅम्पल जप्त

नवी दिल्ली : जगातील सर्वात लोकप्रिय आणि तब्बल 100 वर्ष जुनी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या बेबी पावडरमध्ये कॅन्सर निर्माण करणारे तत्व आढळल्याची माहिती आहे. रॉयटरच्या वृत्तानुसार, जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरचं सॅम्पल हिमाचल प्रदेशच्या कंपनीतून जप्त करण्यात आलं आहे. औषध नियामक विभागाने ही कारवाई केली. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला त्यांच्या प्रोडक्ट्समध्ये कॅन्सरचे तत्व असल्याचं कित्येक वर्षांपासून […]

जॉन्सन बेबी पावडरने बाळाला कॅन्सरची भीती, सॅम्पल जप्त
Nupur Chilkulwar

|

Jul 05, 2019 | 4:49 PM

नवी दिल्ली : जगातील सर्वात लोकप्रिय आणि तब्बल 100 वर्ष जुनी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या बेबी पावडरमध्ये कॅन्सर निर्माण करणारे तत्व आढळल्याची माहिती आहे. रॉयटरच्या वृत्तानुसार, जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरचं सॅम्पल हिमाचल प्रदेशच्या कंपनीतून जप्त करण्यात आलं आहे. औषध नियामक विभागाने ही कारवाई केली.

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला त्यांच्या प्रोडक्ट्समध्ये कॅन्सरचे तत्व असल्याचं कित्येक वर्षांपासून माहित आहे, तरीही त्यांनी ही माहिती जाणीवपूर्वक लपवल्याचा दावा मागील आठवड्यात रॉयटरकडून करण्यात आला होता.

या बातमीचे गांभीर्य ओळखून औषध नियामक विभागाने कंपनीच्या कारखान्यातून बेबी पावडरचे सॅम्पल जप्त केले. औषध नियामक विभागाच्या मते, जर पावडरमध्ये खरचं कॅन्सरचे तत्व असतील तर ते लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक आहे. मात्र जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीकडून अद्याप पावडरचे सॅम्पल जप्त केल्या प्रकरणी कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

रॉयटरच्या वृत्तानंतर, जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने बेबी पावडरमध्ये कॅन्सरचे तत्व असल्याची बातमी चुकीची असल्याचा दावा केला होता. एक लाखाहून अधिक लोकांवर केलेल्या रिसर्चमध्ये कुणालाही कॅन्सस असल्याचं आढळून आलं नाही, असाही दावा कंपनीने केला होता.

काही वृत्तांवर गांभीर्याने विचार करुन या कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे, सध्या या सॅम्पलचा तपास होतो आहे, असे तेलंगणाच्या औषध निरीक्षक सुरेंद्रनाथ साई यांनी सांगितले.

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा अंतर्गत अहवाल, गोपनीय दस्तऐवज आणि 1971 ते 2000 दरम्यान झालेल्या कायदेशीर प्रक्रियांच्या आधारे हे निकष काढण्यात आले की, कंपनीच्या बेबी पावडरमध्ये आक्षेपार्ह घटक आढळून आले. इतक्या वर्षांमध्ये कंपनीच्या बेबी पावडरमध्ये कमी प्रमाणात एस्बेस्टोस आढळून आले. कंपनीला याबाबत संपूर्ण माहिती असूनही त्यांनी औषध नियामक विभागा किंवा ग्राहकांना याची कुठलीही माहिती दिली नाही, असा दावा रॉयटरने केला आहे.

जॉन्सन अँड जॉन्सन ही कंपनी लहान मुलांचे प्रोडक्ट्स बनवते, यात बेबी पावडर, बेबी क्रीम, बेबी लोशन, बेबी सोप इत्यादी लहान मुलांच्या वापराच्या वस्तूंचा समावेश आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी ही लहान मुलांचे प्रोडक्ट्ससाठी जगातील सर्वात लोकप्रिय कंपनी आहे. 100 वर्षांहून अधिक काळापासून ही कंपनी अस्तित्वात आहे. प्रत्येक नवजात बाळासाठी त्याच्या आईची पहिली पसंती ही जॉन्सन अँड जॉनसन बेबी प्रोडक्ट्सला असते. त्यामुळे जर खरचं या कंपनीच्या प्रोडक्ट्समध्ये कॅन्सरयुक्त तत्व असतील तर लहान मुलांसाठी हे अत्यंत नुकसानदायक ठरु शकतं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें