Railway Privatization | भारतीय रेल्वेची खासगीकरणाकडे वाटचाल, 109 मार्गांवर 151 खासगी रेल्वे धावणार

भारतीय रेल्वे 109 मार्गांवर खासगी सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे (Indian railways towards privatization).

Railway Privatization | भारतीय रेल्वेची खासगीकरणाकडे वाटचाल, 109 मार्गांवर 151 खासगी रेल्वे धावणार
मध्य रेल्वे @ 70; उद्यापासून 71व्या गौरवशाली वर्षात पदार्पण
Follow us
| Updated on: Jul 02, 2020 | 11:04 AM

नवी दिल्ली : भारतात गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे खासगीकरणाचा मुद्दा चर्चेत आहे (Indian railways towards privatization). अखेर बुधवारी (1 जुलै) रेल्वे प्रशासनाने याबाबत मोठी घोषणा केली. केंद्र सरकारने प्रवासी रेल्वे गाड्यांसाठी खासगी क्षेत्राला आमंत्रित केलं आहे. खासगी क्षेत्रातून केंद्र सरकारला जवळपसा 30 हजार कोटींच्या गुंतवणुकीची अपेक्षा आहे.

भारतीय रेल्वे 109 मार्गांवर खासगी सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे. या मार्गांवर जळपास 151 रेल्वे गाड्या चालवण्याची योजना आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध पत्रक जारी करत माहिती दिली आहे (Indian railways towards privatization).

रोजगाव वाढवणं, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं, त्यावर होणाऱ्या देखभाल खर्चात कपात करण्याच्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय प्रवाशांना वर्ल्ड क्लास अनुभव आणि सुरक्षित प्रवासाच्या हेतून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

या योजनेअंतर्गत वापरण्यात येणाऱ्या रेल्वेगाड्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या असतील. विशेष म्हणजे सर्व रेल्वे गाड्या भारतात तयार केलेल्या असतील. या गाड्यांचा वेग सरकारी रेल्वे गाड्यांच्या तुलनेत जास्त असेल. या रेल्वेगाड्या जवळपास ताशी 160 किमीच्या वेगाने धावतील.

दरम्यान, सर्व रेल्वेगाड्यांचा निर्मितीचा, देखभालीचा आणि दररोजचा खर्च खासगी कंपन्या करतील. या योजनेअंतर्गत खासगी कंपन्यांसोबत रेल्वे मंत्रालयाचा जवळपास 35 वर्षांचा करार होईल. सर्व रेल्वे गाड्या भारतीय रेल्वेचे ड्रायव्हर आणि गार्ड्सकडून चालवण्यात येतील. खासगी कंपन्यांना भारतीय रेल्वेला ऊर्जा शुल्क तसेच निविदा प्रक्रियेद्वारे ठरवलेल्या महसुलाचा वाटा द्यावा लागेल.

देशात जवळपास 13 हजार प्रवासी रेल्वे गाड्या रेल्वेच्या विविध मार्गांवर धावतात. पण प्रवाशांची मागणी पाहता देशात 20 हजार रेल्वे प्रवासी गाड्या नियमित धावण्याची आवश्यकता आहे. त्याच पार्श्वभूमीवर रेल्वेने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.