पाणी पिण्याच्या बहाण्याने घर गाठलं, गर्भवती पत्नीची गोळी झाडून हत्या, वर्ध्यात जवानाची आत्महत्या

वर्धा येथे सैनिकाने गर्भवती पत्नीची गोळी झाडत हत्या करत स्वत: वरही गोळ्या झाडत आत्महत्या केली (Soldier kill wife Wardha) आहे.

पाणी पिण्याच्या बहाण्याने घर गाठलं, गर्भवती पत्नीची गोळी झाडून हत्या, वर्ध्यात जवानाची आत्महत्या
| Edited By: | Updated on: Jul 02, 2020 | 9:58 AM

वर्धा : वर्धा येथे सैनिकाने गर्भवती पत्नीची गोळी झाडत हत्या करत स्वत: वरही गोळ्या झाडत आत्महत्या केली (Soldier kill wife Wardha) आहे. ही धक्कादायक घटना वर्ध्याच्या पुलगाव येथे घडली आहे. सैनिक ड्युटीवरून पाणी पिण्याच्या बहाण्याने गायब होत घरी आला. त्यानंतर त्याने इंसास रायफलने गर्भवती पत्नीवर गोळी झाडत हत्या केली. यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पतीचाही सावंगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला (Soldier kill wife Wardha) आहे.

या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

मृत सैनिकाचे नाव अजय कुमार सिंह (25) आणि मृत पत्नीचे नाव प्रियंका कुमारी (26) आहे. हे दोघेही मूळचे बिहार राज्यातले आहेत. दोन वर्षांपूर्वीच दोघांचे लग्न झाले होते. तर पत्नी गरोदर होती.

संबंधित बातम्या :

नालासोपाऱ्यात गुंडांचा हैदोस, मित्राच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या तरुणावर तलवार हल्ला

Nagpur Crime | आधी युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षांवर, आता शिवसेनेच्या शहर प्रमुखांवर गुन्हा दाखल