Nagpur Crime | आधी युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षांवर, आता शिवसेनेच्या शहर प्रमुखांवर गुन्हा दाखल

शिवसेनेचे नागपूर शहर प्रमुख मंगेश कडव यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nagpur Crime | आधी युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षांवर, आता शिवसेनेच्या शहर प्रमुखांवर गुन्हा दाखल

नागपूर : शिवसेनेच्या युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षांवर खंडणीचा गुन्हा दाखल (Shivsena City Chief Mangesh Kadav) झाल्यातर आता शिवसेनेचे शहर प्रमुख मंगेश कडव यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेत चालले तरी काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे (Shivsena City Chief Mangesh Kadav).

राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर नागपुरात गुन्हे दाखल व्हायला लागले आहेत. शिवसेना शहर अध्यक्ष मंगेश कडव यांच्यावर अंबाझरी आणि सक्करदार पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. मंगेश कडव यांच्यावर घरावर कब्जा करणे आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेच्या युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षांवर खंडणीचा गुन्हा

युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड आणि त्यांचा भावावर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यापाऱ्याकडून 15 लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी अजनी पोलिसांनी संजोग राठोड याला अटक केली, तर विक्रम राठोड अद्याप फरार आहेत.

नागपुरात गुन्हेगारी वाढत आहे, हे बरोबर असलं तरी आता राजकीय आणि तेही सत्तेत असलेल्या शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत आहेत (Shivsena City Chief Mangesh Kadav).

संबंधित बातम्या :

नागपुरात पशु खाद्याच्या आड दारुची तस्करी, 51 लाखांचा माल जप्त

इचलकरंजीत कर्जाचं आमिष दाखवून महिलांची फसवणूक, फायनान्स कंपनीच्या एजंटसह तिघांवर गुन्हा, दोघांना अटक

Pune Firing : पुण्यात पूर्ववैमनस्यातून पोलीस पाटलावर गोळीबार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *