Pune Firing : पुण्यात पूर्ववैमनस्यातून पोलीस पाटलावर गोळीबार

पुण्यात एका पोलीस पाटलांवर गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना खेड तालुक्यातील वरची भांबुरवाडी येथे (Firing on Police Patil Pune) घडली.

Pune Firing : पुण्यात पूर्ववैमनस्यातून पोलीस पाटलावर गोळीबार

पुणे : पुण्यात एका पोलीस पाटलांवर गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना खेड तालुक्यातील वरची भांबुरवाडी येथे (Firing on Police Patil Pune) घडली. सचिन वाळुंज असं या पोलीस पाटलाचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली (Firing on Police Patil Pune) आहे.

या गोळीबारात सचिन वाळुंज हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या राजगुरुनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आरोपींनी वाळुंज यांच्यावर तब्बल चार राऊंड फायर केले. यापैकी एक गोळी त्यांच्या हाताला लागली आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती खेड पोलिसांनी दिली आहे.

आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत. या प्रकरणाची पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

दरम्यान, पुण्यात लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांच्या चिंतेत भर पडली आहे. नुकतेच पुण्यात गांजा-चरस तस्करी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी 2 कोटी 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

संबंधित बातम्या :

माहेरी गेलेल्या पत्नीचा फोटो फेसबुकवर पाहून संताप, तीन मुलांची हत्या करुन पित्याची आत्महत्या

अहमदनगरमध्ये विहिरीत उडी मारुन पतीची आत्महत्या, पतीला वाचवताना पत्नीचाही मृत्यू

पुण्यात गांजा-चरस तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या, 2 कोटी 10 लाखाचा मुद्देमाल जप्त

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *