नालासोपाऱ्यात गुंडांचा हैदोस, मित्राच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या तरुणावर तलवार हल्ला

नालासोपाऱ्यात मित्राचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या युवकावर भररस्त्यात तलवारीने वार करण्यात आले (Sword attack on boy Nalasopara) आहे.

नालासोपाऱ्यात गुंडांचा हैदोस, मित्राच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या तरुणावर तलवार हल्ला

नालासोपारा : नालासोपाऱ्यात मित्राचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या युवकावर भररस्त्यात तलवारीने वार करण्यात आले (Sword attack on boy Nalasopara) आहे. ही घटना 29 जून रोजी नालासोपारा पूर्व येथील प्रगती नगर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली (Sword attack on boy Nalasopara) आहे.

गुंडांच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. संजय मिश्रा (वय 22) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

याबाबत 30 जून रोजी 4 गुंडाविरोधात तुलिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर इतर तीन जणांचा शोध पोलीस घेत आहेत, अशी माहिती तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.डी. पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, नालासोपाऱ्यात हातात तलवारी घेऊन खुलेआम गुंडांचा नंगानाच सुरु आहे. कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे काढले जात आहेत. हातात तलवार, लाठी-काठी घेऊन गुंडांचा हैदोस सुरु असल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

संबंधित बातम्या :

Pune Firing : पुण्यात पूर्ववैमनस्यातून पोलीस पाटलावर गोळीबार

Nagpur Crime | नागपुरात जुन्या वैमनस्यातून तरुणाची हत्या, तडीपार आरोपीसह तिघांना अटक

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *