AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Lockdown | पुण्यात कडकडीत लॉकडाऊन, आयटी, दूरसंचार कंपन्या, एमआयडीसी क्षेत्र सुरुच राहणार

पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहा दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन आज (13 जुलै) मध्यरात्रीपासून सुरु झाला आहे (Industries and IT sectors will function during Lockdown in Pune)

Pune Lockdown | पुण्यात कडकडीत लॉकडाऊन, आयटी, दूरसंचार कंपन्या, एमआयडीसी क्षेत्र सुरुच राहणार
| Updated on: Jul 14, 2020 | 12:01 AM
Share

पुणे : पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहा दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन आज (13 जुलै) मध्यरात्रीपासून सुरु झाला आहे (Industries and IT sectors will function during Lockdown in Pune). दरम्यान, या लॉकडाऊन काळात सर्व औद्योगिक आस्थापना, आयटी कंपन्या, दूरसंचार कंपन्या आणि एमआयडीसी क्षेत्र सुरुच राहणार आहेत. या कंपन्यांमधील अधिकारी, कामगार यांना रोजच्या प्रवासासाठी पोलीस पासची गरज नसेल, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी दिली.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर उद्योग, आस्थापनांनी त्यांच्या कामगार, कर्मचाऱ्यांना दिलेले पासेस, पुणे महापालिका, पिंपरी- चिंचवड महापालिका तसेच पुणे ग्रामीण क्षेत्रात येण्या-जाण्यास पात्र राहतील, असं विभागीय आयुक्तांनी सांगितलं आहे (Industries and IT sectors will function during Lockdown in Pune).

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“कंपन्यांच्या एचआर विभाग प्रमुखाने कंपनीच्या लेटरहेडवर वाहन परवाना द्यावा. या परवान्यांची माहिती एचआरने संबंधित पोलीस आयुक्त आणि पोलीस स्टेशन प्रभारी यांना द्यावी. कामगार-अधिकाऱ्यांनी कंपनीने दिलेला वाहन परवाना सोबत ठेवणे बंधनकारक असेल”, अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली.

“मेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि रुग्णवाहिकांना शहरांतर्गत वाहतुकीसाठी वेगळ्या पासची अथवा परवानगीची गरज नाही. तसेच पेट्रोल पंप आणि गॅस पंप सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत शासकीय, अत्यावश्यक सेवेतील तसेच परवानगी दिलेल्या कंपन्यांच्या वाहनांसाठी सुरु राहतील”, असं दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं

“पुण्यात मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा सुरु झालेले एमआयडीसी क्षेत्र सुरुच राहणार आहेत. पण जिल्ह्यात पाचपेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कटेन्मेंट झोनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चाकण, तळेगाव, रांजणगाव, बारामती, जेजुरी, कुरकुंभसह जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी क्षेत्र सुरु राहतील”, असं दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केलं.

“ग्रामीण भागातील कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या सर्व ग्रामपंचायती, तालुक्याच्या ठिकाणची शेती संबंधित खते, औषधे आणि अवजारांच्या दुकानांवर कोणत्याही प्रकारची निर्बंध घालण्यात आलेले नाहीत”, अशी माहितीदेखील म्हैसेकर यांनी दिली.

संबंधित बातमी : Pune Lockdown Rules | पुण्यात लॉकडाऊनची नियमावली जाहीर, काय सुरु काय बंद?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.