Jammu and Kashmir | अतिरेक्यांचा बीडीसी अध्यक्षांवर गोळीबार, भूपिंदर सिंह यांचा जागीच मृत्यू

जम्मू-काश्मीरच्या खग येथील ब्लॉक डेवलपमेंट काउंसिलचे (बीडीसी) अध्यक्ष भूपिंदर सिंह यांच्यावर बडगाम येथे अतिरेक्यांनी गोळीबार केला. (Jammu Kashmir BDC chairman of Khag Bhupinder Singh killed by terrorists).

Jammu and Kashmir | अतिरेक्यांचा बीडीसी अध्यक्षांवर गोळीबार, भूपिंदर सिंह यांचा जागीच मृत्यू

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या खग येथील ब्लॉक डेवलपमेंट काउंसिलचे (बीडीसी) अध्यक्ष भूपिंदर सिंह यांच्यावर बडगाम येथे अतिरेक्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात भूपिंदर सिंह यांचा जागीच मृत्यू झाला. जम्मू-काश्मीर पोलिसांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे (Jammu Kashmir BDC chairman of Khag Bhupinder Singh killed by terrorists).

“काही अतिरेक्यांनी बीडीसी अध्यक्ष भूपिंदर सिंह यांच्यावर बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गोळीबार केला. ते श्रीनगर येथे वास्तव्यास होते. मात्र, ते आज पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना न देता दलवाश गावात गेले. तिथे त्यांच्यावर हल्ला झाला”, असं जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितलं आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये याआधीदेखील अतिरेक्यांनी नेत्यांवर गोळीबार करुन हत्या केल्याची घटना घडल्या आहेत. काही अतिरेक्यांनी जुलै महिन्यात बंदीपोरा येथे भाजप नेते वसीम बारी यांची हत्या केली होती. अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात वसीम यांचे वडील बशीर अहमद आणि भाऊ उमर सुल्तान यांचादेखील मृत्यू झाला होता (Jammu Kashmir BDC chairman of Khag Bhupinder Singh killed by terrorists).

त्याआधी काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग येथे अतिरेक्यांनी सरपंच अजय पंडिता यांची हत्या केली होती. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित द रेजिस्टेंस फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. अजय पंडिता हे काँग्रेसचे नेते होते. हल्लेखोरांनी अजय यांच्या घराजवळच जाऊन गोळीबार केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

संबंधित बातमी : भाजप नेते वसीम बारी यांची हत्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI