‘सिंघम’फेम काजल अग्रवालच्या भेटीचं आमिष, चाहत्याला 60 लाखांचा गंडा

मुंबई : आपल्या लाडक्या सेलिब्रिटींच्या भेटीसाठी चाहते कोणत्या थराला जातील सांगता येत नाही. ‘सिंघम’ चित्रपटामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) ची भेट घेण्याच्या नादात तिचा फॅन ठकसेनांना बळी पडला. त्याने थोडे-थोडके नव्हे, तर तब्बल 60 लाख रुपये मोजले, मात्र एवढं करुन काजलची भेट झाली नाहीच. फिल्मस्टार्सच्या घराखाली पावसा-पाण्यात तास-तासभर उभे राहणारे चाहते आपल्यासाठी […]

'सिंघम'फेम काजल अग्रवालच्या भेटीचं आमिष, चाहत्याला 60 लाखांचा गंडा
(फोटो : काजल अगरवाल इन्स्टाग्राम अकाऊण्ट)
Follow us
| Updated on: Aug 02, 2019 | 1:21 PM

मुंबई : आपल्या लाडक्या सेलिब्रिटींच्या भेटीसाठी चाहते कोणत्या थराला जातील सांगता येत नाही. ‘सिंघम’ चित्रपटामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) ची भेट घेण्याच्या नादात तिचा फॅन ठकसेनांना बळी पडला. त्याने थोडे-थोडके नव्हे, तर तब्बल 60 लाख रुपये मोजले, मात्र एवढं करुन काजलची भेट झाली नाहीच.

फिल्मस्टार्सच्या घराखाली पावसा-पाण्यात तास-तासभर उभे राहणारे चाहते आपल्यासाठी नवीन नाहीत. फिल्मच्या सेटवर सिताऱ्यांची एक झलक पाहण्यासाठी ग्रामीण भागातून अनेक जण येतात. मात्र काजल अग्रवालच्या या चाहत्याने तिची भेट घेण्यासाठी लाखो रुपये मोजण्याचा पर्याय निवडला. अभिनेत्री काजल ही पैसे घेऊन मोबदल्यात फॅन्सना भेटणाऱ्यांपैकी नाही. त्यामुळे या चाहत्याची गाठ पडली ती भामट्यांशी.

तामिळनाडूतील रामनंतपुरमचा रहिवासी असलेल्या या चाहत्याला आपली ओळख उघड करायची नाही. हा चाहता काजल अग्रवालच्या भेटीसाठी उत्सुक होता. तितक्यात त्याच्या नजरेत एक वेबसाईट आली. काजलची भेट घडवून देण्याचं आश्वासन या वेबसाईटवर देण्यात आलं होतं.

50 हजारांचा पहिला हफ्ता

काजलची भेट घेण्याची आपली इच्छा चाहत्याने व्यक्त केल्यानंतर ठकसेनांच्या टोळीने त्याच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे त्याने सहजतेने ही रक्कम दिली. त्याच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येताच भामट्यांचंही आयतंच फावलं.

भामट्यांची उलट धमकी

काजल अग्रवालची भेट घडवून देण्याचं आमिष दाखवत या टोळीने तीन हफ्त्यांमध्ये आणखी रक्कम देण्याची मागणी चाहत्याकडे केली. अशा पद्धतीने त्याने साठ लाख रुपये टोळीच्या बँक खात्यात जमा केले. आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात येताच त्याने अधिक रक्कम देण्यास नकार दिला. त्यावर टोळीने चाहत्याला त्याचे अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची भीती घातली.

निर्माता ताब्यात

घाबरलेल्या चाहत्याने राहत्या घरातून पळ काढला. पोलिसांना तो कोलकात्यामध्ये लपून बसलेला आढळला. अधिक चौकशी केली असता, पोलिसांना संपूर्ण कथानक समजलं. चाहत्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी निर्माते श्रावणकुमार (Saravanakumar) यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.