AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kamala Harris | भारतीयवंशाच्या कमला हॅरिस यांचा ऐतिहासिक विजय, अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष

डेमॉक्रेटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला आहे.

Kamala Harris | भारतीयवंशाच्या कमला हॅरिस यांचा ऐतिहासिक विजय, अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 07, 2020 | 11:08 PM
Share

वॉशिंग्टन : डेमॉक्रेटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला आहे. भारतीयवंशाच्या कमला हॅरिस यांनी एकाचवेळी अनेक विक्रम केले आहेत. त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्रपती, पहिल्या कृष्णवर्णीय अमेरिकन आणि पहिल्या आशियायी अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष ठरल्या आहेत (Kamala Harris has made history by winning US Vice President Election)

डेमॉक्रेटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव केलाय. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालाप्रमाणे बायडन यांना 273 मतं, तर ट्रम्प यांना 214 मतं मिळाली आहेत. या विजयाबरोबरच बायडन हे अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. अमेरिकेत बहुमतासाठी 270 मतांची आवश्यकता असते.

अमेरिकेतील पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष

अमेरिकेच्या निवडणूक इतिहासात आतापर्यंत एकही महिला उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकू शकलेली नव्हती. मात्र, कमला हॅरिस यांनी विजय मिळवत इतिहास रचला आहे. याआधी अमेरिकेत दोन महिलांना उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली होती. 2008 मध्ये रिपब्लिकन पक्षाकडून सारा पॅलिन यांना, तर 1984 मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाकडून गिरालडिन फेरारो यांना उपराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली होती. मात्र, दोन्ही वेळा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. असं असलं तरी अमेरिकेत कृष्णवर्णीय महिलेला उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची ही पहिलीच वेळ होती. कमला हॅरिस यांनी यात विजय मिळवत एकाचवेळी अनेक विक्रम केले आहेत.

कोण आहेत कमला हॅरिस?

ऑक्‍टोबर 1964 ला जन्‍म झालेल्या कमला हॅरिस अमेरिकेच्या सिनेटमध्ये निवडून जाणाऱ्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला आहेत. सध्या त्या सिनेटच्या सदस्य तर आहेच, सोबत डेमॉक्रॅटिक पक्षाकडून त्या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवडूनही आल्या आहेत. त्या 2016 मध्ये पहिल्यांदा डेमॉक्रेटिक पक्षाच्या सिनेट सदस्‍य झाल्या. सिनेटमध्ये त्या कॅलिफोर्नियाचं प्रतिनिधित्‍व करतात. याआधी त्या 2011 ते 2017 पर्यंत स्‍टेट अॅटोर्नी जनरल देखील होत्या.

संबंधित बातम्या :

कमला हॅरिस यांचा पावसातील डान्सचा व्हिडीओ वायरल, ट्विटरवरही प्रतिक्रियांचा पाऊस

US Election : अमेरिकेच्या निवडणुकीत इतिहास, पहिल्यांदाच भारतीय वंशाच्या महिलेला उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी

संबंधित व्हिडीओ :

Kamala Harris has made history by winning US Vice President Election

Follow Us
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...