दसरा मेळाव्यात गायकाचं तरुणीला स्टेजवर प्रपोज, नेत्याकडून जोडप्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस

| Updated on: Oct 06, 2019 | 6:40 PM

कन्नड रॅपर चंदन शेट्टीने सरकारी दसरा मेळाव्यात थेट स्टेजवर प्रेयसीला प्रपोज (Kannad Rapper Chandan Shetty propose lover) केले.

दसरा मेळाव्यात गायकाचं तरुणीला स्टेजवर प्रपोज, नेत्याकडून जोडप्याला कारणे दाखवा नोटीस
Follow us on

बंगळुरु: आपल्या प्रेयसीला प्रभावित करण्यासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. कर्नाटकमधील म्हैसूर येथे देखील असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. कन्नड रॅपर चंदन शेट्टीने सरकारी दसरा मेळाव्यात थेट स्टेजवर प्रेयसीला प्रपोज (Kannad Rapper Chandan Shetty propose lover) केले. यानंतर नाराज मंत्र्यांनी पोलिसांच्या मार्फत चंदन शेट्टीला सरकारी मंचाचा खासगी कारणासाठी उपयोग केल्याप्रकरणी नोटीस (Police Notice for Propose Lover) पाठवली आहे.

रॅपर चंदन शेट्टीने शुक्रवारी (4 ऑक्टोबर) सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमात अचानक प्रपोज केल्याने त्याच्या चाहत्यांनी जोरदार जल्लोष केला. मात्र, त्यामुळे आयोजक मंत्री आणि त्यांचे कार्यकर्ते मात्र चांगलेच संतापले.


कर्नाटक सरकारने प्रायोजित केलेल्या या दसरा कार्यक्रमात अनेक लोक सहभागी झाले होते. समोर मैदना खच्चून भरले होते. याचवेळी चंदन शेट्टीने अचनाकपणे स्टेजवर जाऊन प्रेयसी निवेदिता गौडा हिला प्रपोज केला. विशेष म्हणजे निवेदितानेही चाहत्यांच्या जल्लोषात चंदनचं प्रपोज स्वीकारलं. चंदनचा गुडघ्यावर उभा राहून निवेदिताला अंगठी देतानाचा फोटोही चांगलाच व्हायरल झाला आहे. निवेदिता गौडा देखील या क्रार्यक्रमात चंदन शेट्टीप्रमाणेच सहभागी झालेली होती.

म्हैसूर जिल्ह्याचे पालकमंत्री व्ही. सोमन्ना यांनी चंदनच्या या कृतीवर चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पोलिसांना सांगून सार्वजनिक मंचाचा वैयक्तिक कामासाठी उपयोग केल्याप्रकरणी चंदनला नोटीसही दिली आहे.

सोमन्ना म्हणाले, “शेट्टीच्या या कृतीने आम्हीही आश्चर्यचकित झालो. आम्हाला याची कोणतीही कल्पना नव्हती. त्याने आयोजकांना अंधारात ठेऊन हे केलं. सार्वजनिक मंचाचा असा उपयोग करणे चुकीचे आहे. याविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.”

या वादानंतर चंदन शेट्टीने देखील एक व्हिडीओ पोस्ट करत या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. तो म्हणाला, “मी याविषयी कुणालाही काहीही सांगितलं नव्हतं. याची गुप्तता पाळत आयोजकांना याची माहिती दिली नव्हती. ही काही एन्गेजमेंट नव्हती. मी अगदी स्वच्छ हेतून चाहत्यांना आनंदी करण्यासाठी हे केलं होतं.” या प्रकारानंतर लक्ष्मीपुरम पोलिसांकडे 3 तक्रारी दाखल झाल्या आहेत.