Kojagiri 2020 | कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ‘स्पेशल खीर’, मसाले दुधाला उत्तम पर्याय!

शरद पौर्णिमेच्या रात्री मसाले दूध मोकळ्या आकाशाखाली ठेवून त्यात चंद्राचे प्रतिबिंब दिसल्यावर प्राशन करण्याची प्रथा फार पूर्वीपासून चालत आहे.

Kojagiri 2020 | कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ‘स्पेशल खीर’, मसाले दुधाला उत्तम पर्याय!
Follow us
| Updated on: Oct 30, 2020 | 4:37 PM

मुंबई : अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला ‘कोजागिरी पौर्णिमा’ (Kojagiri purnima) किंवा शरद ‘पौर्णिमा’ असे म्हटले जाते. आरोग्याच्या दृष्टीने या पौर्णिमेला आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. या रात्री 12 वाजल्यानंतर अमृत पाझरत असल्याने त्याच्या सहवासातील प्रत्येकाला आरोग्याचा लाभ होतो, अशी आख्यायिका आहे. शरद पौर्णिमेच्या रात्री मसाले दूध मोकळ्या आकाशाखाली ठेवून त्यात चंद्राचे प्रतिबिंब दिसल्यावर प्राशन करण्याची प्रथा फार पूर्वीपासून चालत आहे. काही ठिकाणी मसाले दुधाला पर्याय म्हणून खीरदेखील बनवली जाते. पौष्टिक आणि चविष्ट असणारी ही ‘कोजागिरी स्पेशल खीर’ आरोग्यदायी देखील असते.(Kojagiri purnima special Kheer recipe and Kojagiri myths)

कोजागिरी स्पेशल खीर कृती :

  • एका जाड बुडाच्या पातेल्यात एक लिटर दूध घेऊन ते साधारण पाऊण लिटर होईल इतके उकळा.
  • जरा घट्टसर झालेल्या या पाऊण लिटर दुधात आवश्यकतेनुसार तांदूळ घाला.
  • तांदूळ शिजेपर्यंत हे मिश्रण सतत ढवळत राहा.
  • तांदूळ व्यवस्थित शिजल्यानंतर यात आवश्यकतेनुसार साखर घाला.
  • साखर विरघळल्यानंतर खीरीत सुका मेवा आणि वेलची पूड टाका.
  • 5 ते 7 मिनिटे हे खीरीचे मिश्रण नीट ढवळून, नंतर गॅसची आच बंद करून खीर थंड करून सर्व्ह करा.

बऱ्याच ठिकाणी कोजगिरी पौर्णिमेच्या दिवशी ‘मसाले दूध’ प्यायले जाते. मात्र, या ‘मसाले दुधा’ला तुम्ही कंटाळला असाल, तर ही ‘कोजागिरी स्पेशल खीर’ नक्की ट्राय करू शकता. (Kojagiri purnima special Kheer recipe and Kojagiri myths)

कोजागिरी पौर्णिमेच्या आख्यायिका

पुर्ण वर्षभरात फक्त याच दिवशी चंद्र सोळा कलांनी परिपुर्ण असल्याने या रात्रीचे हिंदु धर्मात खूप महत्त्व आहे. या रात्री कोजागिरी व्रत आणि कौमुदी व्रत करण्यात येते. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने ‘महारास’ आयोजित केला होता, असे म्हटले जाते.

कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ आलेला असतो आणि त्याची प्रकाश किरणे समस्त जीवसृष्टीकरता लाभदायक असून, या रात्री औषधींचे सेवन केल्यास त्याचा फार उपयोग होत असल्याची आख्यायिका सांगितली जाते.(Kojagiri purnima special Kheer recipe and Kojagiri myths)

लंकाधीपती रावण या अश्विन पौर्णिमेच्या रात्री चंद्राची किरणे आरश्याच्या सहाय्याने आपल्या नाभिव्दारे ग्रहण करीत असे. त्यामुळेच त्याला पुन्हा पुन्हा तारूण्य प्राप्त होत असल्याची आख्यायिका पुराणात सांगितली आहे.

लक्ष्मीदेवी या रात्री आकाशातुन भ्रमण करते आणि ‘को जागरती’ अर्थात कोण कोण जागरण करतय ते बघते. तसेच, जागरण करणाऱ्यावर देवी प्रसन्न होत असल्याने, त्या व्यक्तीवर लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहातो, अशी कथा फार पूर्वीपासून सांगितली जात असल्याने या दिवशी जागरण करण्याची प्रथा प्रचलित झाली आहे.

(Kojagiri purnima special Kheer recipe and Kojagiri myths)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.