कोल्हापुरातील पाच तालुक्यात 50 हून अधिक कोरोनाबाधित, कोणत्या तालुक्यात किती?

| Updated on: Jun 01, 2020 | 3:54 PM

कोल्हापुरातील कोरोनाबाधितांचा आकडा 607 वर पोहोचला आहे. तर सहा जणांना कोरोनामुळे बळी गेला (Kolhapur Corona Cases Update) आहे.

कोल्हापुरातील पाच तालुक्यात 50 हून अधिक कोरोनाबाधित, कोणत्या तालुक्यात किती?
Follow us on

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबधितांच्या आकड्याने 600 चा टप्पा पार केला (Kolhapur Corona Cases Update) आहे. सुदैवाने आज दिवसभरात एकाही नव्या रुग्णाची नोंद करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सद्यस्थितीत कोल्हापुरातील कोरोनाबाधितांचा आकडा 607 वर पोहोचला आहे. तर सहा जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

कोल्हापुरात 607 कोरोना रुग्णांपैकी 464 लोकांवर कोरोना वॉर्डात उपचार सुरू (Kolhapur Corona Cases Update) आहेत. तर 137 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली. धक्कादायक बाब म्हणजे कोल्हापुरातील पाच तालुक्यात 50 पेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक 155 रुग्ण हे शाहूवाडी तालुक्यात आहेत. तर त्यापाठोपाठ भुदरगड, गडहिंग्लज, चंदगड यासह अनेक तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आज दुपारपर्यंत एकाही नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही. त्यामुळे रुग्ण वाढीचे प्रमाण काही प्रमाणात कमी झालेले दिसत आहे. कोल्हापुरात नोंद झालेले बाधित रुग्ण रेड झोनमधून जिल्ह्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबधितांचा आकडा 607 वर गेला असला तरी सामाजिक संसर्ग रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलं आहे.

मात्र अद्याप 1300 पेक्षा जास्त चाचणीचे अहवाल प्रलंबित आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही चिंतेत दिसत आहे. दरम्यान जिल्ह्यातील बहुतांशी व्यवहार आता सुरळीत सुरु झाला आहे. तसेच काही ठिकाणी एसटीही सुरु झाली आहे. मात्र काही नियम आणि अटी घालून प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे.

कोल्हापुरात कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

  • शाहूवाडी – 155
  • आजरा – 45
  • भुदरगड – 62
  • चंदगड- 57
  • गडहिंग्लज -67
  • गगनबावडा -6
  • हातकणंगले -5
  • कागल- 50
  • करवीर – 12
  • पन्हाळा – 24
  • राधानगरी – 62
  • शिरोळ -7
  • नगरपालिका क्षेत्र – 11
  • महानगरपालिका क्षेत्र 20
  • इतर जिल्हे व राज्यातील – 7

संबंधित बातम्या : 

मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 40 हजारच्या उंबरठ्यावर, कोणत्या वॉर्डात किती रुग्ण?

राज्यातील रेल्वेसेवा अंशत: सुरु, मुंबई-पुण्यातून प्रत्येकी 5 ट्रेन सुटणार, प्रवासासाठी नियम काय?

गिरगावातील प्रसिद्ध डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू, फॅमिली डॉक्टरच्या निधनाने बॉलिवूडचं कपूर कुटुंब शोकात

CORONA | मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 342 कोटी रुपये जमा, केवळ 7 टक्के रक्कम आरोग्य सुविधांसाठी खर्च : आरटीआय