AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापूरच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ओली पार्टी, नातेवाईकांकडून दारुच्या बाटल्या-मटणाची डिलीव्हरी

कोल्हापुरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये काही लोकांनी ओली पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला (Kolhapur Quarantine center Liquor party) आहे.

कोल्हापूरच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ओली पार्टी, नातेवाईकांकडून दारुच्या बाटल्या-मटणाची डिलीव्हरी
| Updated on: Jun 14, 2020 | 8:31 PM
Share

कोल्हापूर : कोल्हापुरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये काही लोकांनी ओली पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिसलेरी बॉटलच्या बॉक्समधून दारुच्या बाटल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आणण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली. विशेष म्हणजे या घटनेनंतर संबंधित व्यक्तींना केवळ तोंडी समज देऊन सोडण्यात आलं आहे. (Kolhapur Quarantine center Liquor party)

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरात अनेक ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाईन केलं जातं आहे. अशाच एका क्वारंटाईन सेंटरमध्ये शनिवारी रात्री काही व्यक्तींनी दारुची पार्टी केली. या सर्वांना बिसलेरी बॉटलच्या बॉक्समधून दारुच्या बाटल्या आणि मटण नातेवाईंकडून या ठिकाणी पोहोचवण्यात आले. त्यानंतर थाटामाटात या ठिकाणी दारुची पार्टी पार पडली.

या सर्व प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी संस्थात्मक विलगीकरण केंद्रात अशाच प्रकार घडला होता. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील संस्थात्मक विलगीकरण केंद्रातही असाच प्रकार घडला होता. त्यामुळे संस्थात्मक विलगीकरण केंद्रात चाललेल्या पार्टी आणि त्या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या कोल्हापुरात 692 कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 521 रुग्ण बरे झाले आहेत.

महाराष्ट्रात 8 जून ते 13 जून या सहा दिवसात महाराष्ट्रात तब्बल 18 हजार 593 इतके रुग्ण वाढले आहेत. गेल्या चार दिवसापासून रुग्णवाढीचा वेग हा तीन हजारांच्या पुढेच आहे. तर दररोज शंभरपेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. (Kolhapur Quarantine center Liquor party)

संबंधित बातम्या : 

महापालिकेच्या नायर कोविड रुग्णालयात त्रिशतक, 300 व्या कोरोनाबाधित मातेची सुखरुप प्रसूती

कोरोना लढ्यासाठी बीडचा प्लॅन “बी” तयार, 1365 रुग्णांवर उपचार करणारं भव्य कोरोना सेंटर सज्ज

Follow Us
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी