AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मुलींवर संस्कार केल्यास बलात्कार थांबतील”, भाजप नेत्याचं वक्तव्य, क्रिती सेननसह स्वरा भास्करचा संताप

उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये एका मुलीवर सामुहिक बलात्कार झाला (kriti Sanon on Bjp mla Surendra Singh).

मुलींवर संस्कार केल्यास बलात्कार थांबतील, भाजप नेत्याचं वक्तव्य, क्रिती सेननसह स्वरा भास्करचा संताप
| Edited By: | Updated on: Oct 05, 2020 | 8:41 AM
Share

मुंबई : उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये एका मुलीवर सामुहिक बलात्कार झाला (kriti Sanon on Bjp mla Surendra Singh). या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत. सर्वच स्तरातील लोकांकडून या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतरही उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांमधील भीती संपलेली नाही. हाथरस घटनेनंतरही उत्तर प्रदेशातून अनेक लाजिरवाण्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले जात आहे. आता उत्तर प्रदेशच्या एका भाजप आमदाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावर अभिनेत्री क्रिती सेनन आणि स्वरा भास्करने आक्षेप घेतला आहे (kriti Sanon on Bjp mla Surendra Singh).

भाजप आमदाराच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर कलाकारांनी आक्षेप घेतला आहे. त्याचे कारण असं की या धक्कादायक घटनेनंतरही मुलींना जबाबदार ठरवले जात आहे आणि त्यांना संस्कारी होण्यासाठी सांगितले जात आहे. तसेच बलात्कार प्रकरणात मुलांच्या संस्कारांवर कुणी काही बोलत नाही. त्यामुळे यावर आक्षेप घेण्यात आला आहे.

“अशा घटना तलवारीने आणि शासन रोखू शकत नाही. पण या घटना चांगल्या संस्काराने रोखल्या जाऊ शकतात. सर्व पालकांनी आपल्या मुलीला चांगले संस्कार शिकवले पाहिजे. कोणत्याही सरकार आणि संस्काराच्या मिश्रणानेच देश सूंदर बनू शकतो”, असं उत्तर प्रदेशचे बलियाचे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी सांगितले.

भाजप आमदाराच्या वक्तव्यानंतर क्रिती सेनन आणि स्वरा भास्करचे ट्वीट

“मुलींना शिकवले पाहिजे की, कशाप्रकारे ते बलात्कारापासून वाचू शकतात. हा व्यक्ती बोलताना स्वत:ला ऐकून घेत आहे का ? ही अशी मानसिकता ज्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. हे खूप वाईट आहे. ते आपल्या मुलांना संस्कार का देऊ शकत नाही ?” , असं ट्वीट अभिनेत्री क्रिती सेनन हीने केलं आहे.

“हा पापी माणूस आहे. भाजप आमदार सुरेंद्र सिंह रेपला डिफेंड करतो’, असं ट्वीट अभिनेत्री स्वरा भास्करने केलं आहे.

स्वराने एका रिट्वीटला ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये एक व्हिडीओ दिसत आहे. यामध्ये सुरेंद्र सिंह उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपींचेही समर्थन करत होता.

संबंधित बातम्या : 

लिफ्टच्या बहाण्याने अल्पवयीन तरुणीला किस, आरोपी 5 महिन्यांनी कल्याणमध्ये जेरबंद

प्रियंका गांधींच्या कपड्यांवर हात टाकणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, चित्रा वाघ यांची योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.