Bharti Singh | कपिल शर्मानंतर कृष्णा अभिषेक भारतीच्या समर्थनार्थ पुढे, टीका करणाऱ्या राजू श्रीवास्तवांना फटकारले!

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी ड्रग्ज प्रकरणावर भाष्य करताना, भारतीवर टीका केली होती. यावर आता कृष्णा अभिषेकने पलटवार करत, प्रत्युत्तर दिले आहे.

Bharti Singh | कपिल शर्मानंतर कृष्णा अभिषेक भारतीच्या समर्थनार्थ पुढे, टीका करणाऱ्या राजू श्रीवास्तवांना फटकारले!
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 11:23 AM

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री भारती सिंहचे (Bharti Singh) नाव समोर आल्यानंतर, तिला अटकही करण्यात आली होती. या सगळ्याचा परिणाम आता तिच्या करिअरवर देखील झाला आहे. भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांची सोनी टीव्हीच्या ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमातून हकालपट्टी झाल्याचे कळते आहे. या सगळ्या प्रकारानंतर कपिल शर्माने भारतीची बाजू घेत तिला कार्यक्रमातून काढू नये, अशी विनंती केली होती. आता अभिनेता, कॉमेडियन कृष्णा अभिषेकदेखील (Krushna Abhishek) भारतीच्या समर्थनार्थ पुढे आला आहे (Krushna Abhishek Slams Raju Srivastava over bharti singh drugs case).

कृष्णा अभिषेकने भारतीची बाजू घेत, तिच्यावर टीका करणाऱ्यांना फटकारले आहे. यात अग्रस्थानी आहेत कॉमेडियन राजू श्रीवास्तव. कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी ड्रग्ज प्रकरणावर भाष्य करताना, भारतीवर टीका केली होती. यावर आता कृष्णा अभिषेकने पलटवार करत, प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले राजू श्रीवास्तव?

ड्रग्ज प्रकरणात भारतीला अटक झाल्यानंतर अभिनेता, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, ‘लाखो लोक तुला त्यांची आयडियल मानतात. तुझे फोटो त्यांच्या फोनमध्ये असतात. त्यांना तुझ्यासारखे व्हावे, असे वाटते. असे असतानाही तुला ड्रग्ज घेण्याची गरज का भासली?, ड्रग्ज घेतल्याने कुठलीही ताकद मिळत नाही. त्याने कुठलीही प्रसिद्धी मिळणार नाही.’

त्याने सगळ्यांसोबतचे नाते खराब केले…

कृष्णा अभिषेक यांनी आता राजू यांच्या या प्रतिक्रियेला सणसणीत उत्तर दिले आहे. कृष्णा म्हणतो, ‘प्रतिक्रिया सगळ्यांनीच दिल्या. परंतु, राजू श्रीवास्तव यांची टीका अतिशय हीन दर्जाची होती. त्यांनी भारतीबद्दल जे काही म्हटले ते अतिशय वाईट आणि धक्कादायक होते. यामुळे त्यांनी सगळ्यांसोबतचे नाते खराब केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आमच्या संपूर्ण टीमला वाईट वाटले आहे. एकाच क्षेत्रात काम करत असताना, त्यांनी भारतीबद्दल असे बोलणे चुकीचे आहे (Krushna Abhishek Slams Raju Srivastava over bharti singh drugs case).

कामाची नशा करा : सुनील पाल

कॉमेडियन सुनील पाल यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केले होते. ‘या क्षणी मला भारतीचा राग येतो आहे. मला तिला ओरडायचे आहे. आमच्या कॉमेडीचा भरती अभिमान होती. पूर्वी महिला कॉमेडी करत नव्हत्या. पण, भारतीमुळे अनेक स्त्रियांना कॉमेडी करण्याची प्रेरणा मिळाली. आज या प्रकारामुळे लोक सगळ्या कॉमेडियन्सकडे त्याच नजरेने पाहत आहेत. पण तरीही एनसीबीने केलेल्या कारवाईचे मी स्वागत करतो’, असे सुनील यांनी म्हटले होते.

पुढे, भारती यांना सल्ला देताना सुनील पाल म्हणाले, ‘कामाची नशा करा, अमली पदार्थांची नाही. आई सरस्वतीने तुम्हाला या ठिकाणापर्यंत पोहचवले आहे. वास्तविक हा आई सरस्वतीचा अपमान आहे.’

(Krushna Abhishek Slams Raju Srivastava over bharti singh drugs case)

Non Stop LIVE Update
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.