KTM 790 Duke भारतात लाँच, किंमत तब्बल…

KTM ने भारतीय बाजारात बहुप्रतिक्षित अशी मिडलवेट स्पोर्ट-नेकेड बाईक 790 Duke लाँच केली (KTM 790 duke launched in India). KTM 790 Duke ची एक्स शोरुम किंमत 8.64 लाख रुपये आहे. ही बाईक भारतात केटीएमचं फ्लॅगशिप मॉडेल आहे.

KTM 790 Duke भारतात लाँच, किंमत तब्बल...
Nupur Chilkulwar

|

Sep 23, 2019 | 5:13 PM

मुंबई : KTM ने भारतीय बाजारात बहुप्रतिक्षित अशी मिडलवेट स्पोर्ट-नेकेड बाईक 790 Duke लाँच केली (KTM 790 duke launched in India). KTM 790 Duke ची एक्स शोरुम किंमत 8.64 लाख रुपये आहे. ही बाईक भारतात केटीएमचं फ्लॅगशिप मॉडेल आहे. सध्या या बाईकला बीएस-4 इंजिनसोबत बाजारात उतरवण्यात आलं आहे. या बाईकचे सध्या फक्त 100 यूनिटचं भारतात लाँच करण्यात आले आहेत (KTM 790 duke launched in India). भारतात ही CKD यूनिटच्या रुपात येईल. याचं लूक शार्प आणि अग्रेसीव्ह आहे.

KTM 790 Duke मध्ये शार्प स्टाईल फ्युअल टँक, एलईडी हेडलॅम्प, स्प्लिट सीट्स आणि एलईडी टेललाईट देण्यात आली आहे. बाईकचा एग्झॉस्ट सीटच्या खाली देण्यात आला आहे. KTM 790 Duke आंतरराष्ट्रीय बाजारात आधीपासबून उपलब्ध आहे. यामध्ये 799cc, पॅरलल-ट्वीन इंजिन आहेत, जे 105hp पावर आणि 86Nm पीक टॉर्क जनरेट करतं. इंजिनमध्ये 6-स्पीड गियरबॉक्स आहेत.

फिचर्स

KTM 790 Duke मध्ये 43mm, नॉन-अॅडजस्टेबल USD फोर्क आणि प्री-लोड मोनोशॉक सस्पेंशन देण्यात आले आहेत. बाईकमध्ये फुल-टीएफटी डिस्प्ले, बॉश कॉर्नरिंग एबीएस, लीन-अँगल सेंसिंग ट्रॅक्शन कंट्रोल, लाँच कंट्रोल आणि बाय-डायरेक्शनल क्विक शिफ्टर सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. बाईकमध्ये 4 राइडिंग मोड आणि 17-इंचाचे अलॉय व्हिल्ज देण्यात आले आहेत. समोरच्या बाजूला 300 mm ड्युअल डिस्क आणि रियरमध्ये 240 सिंगल डिस्क ब्रेक आहे.

मुंबई, दिल्ली, पुण्यात उपलब्ध

KTM च्या या नव्या 790 Duke बाईकची बाजारातील ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल, यामाहा एमटी-09, कावासाकी झेड 900 आणि दुकाटी मॉन्सटर 821 यांसारख्या बाईकशी स्पर्धा असेल. सध्या KTM 790 Duke ही बाईक फक्त मुंबई, दिल्ली, बंगळुरु, पुणे, कोलकाता, हौद्राबाद, सूरत, गुवाहाटी आणि चेन्नईया शहरांत उपलब्ध आहे. एप्रिल 2020 पर्यंत ही बाईक इतर 30 शहरांमध्येही उपलब्ध असेल.

संबंधित बातम्या :

गावागावात, शहरात पोहोचलेली टाटा सुमो आता खरेदी करता येणार नाही

… म्हणून या सायकलची किंमत तब्बल 135000 रुपये

Renault कंपनीची इलेक्ट्रिक कार लाँच, पाहा फीचर आणि किंमत

Tata Motors Altroz : लाँचपूर्वीच फोटो लीक, पाहा कशी असेल टाटाची अल्ट्रोझ

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें