मालिका विश्वावर पुन्हा शोककळा, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन!

‘कुमकुम भाग्य’ या मालिकेत ‘इंदू दादी’ साकारणाऱ्या अभिनेत्री जरिना रोशन खान (Actress Zarina Roshan Khan) यांचे निधन झाले आहे.

मालिका विश्वावर पुन्हा शोककळा, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन!

मुंबई : एकीकडे कोरोनाचे थैमान सुरूच आहे. तरीही काळजी घेत मालिकांच्या सेटवर चित्रीकरण सुरू आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे यासाठी कलाकारदेखील शक्य तितकी काळजी घेऊन काम करत आहेत. यातच हिंदी मालिका विश्वावर पुन्हा एक शोककळा पसरली आहे. ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेत ‘इंदू दादी’ साकारणाऱ्या अभिनेत्री जरिना रोशन खान (Actress Zarina Roshan Khan) यांचे निधन झाले आहे.( Kumkum Bhagya Indu Dadi fame actress Zarina Roshan Khan Passed away)

मुंबईतील राहत्या घरी कार्डियाक अरेस्टमुळे पहाटेच्या सुमारास त्यांचे निधन झाले. 54 वर्षीय जरीन खान यांचे ‘कुमकुम भाग्य’ मालिकेतील ‘इंदू दादी’ हे पात्र विशेष गाजले होते. या मालिकेतील त्यांचे सहकलाकार शब्बीर अहलुवालिया आणि श्रिति झा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली.

शब्बीर अहलुवालियाने दिला आठवणींना उजाळा

मालिकेत ‘अभि’चे पात्र साकारणारा अभिनेता शब्बीर अहलुवालियाने ‘इंदू दादी’सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ‘ये चांद सा रोशन चेहरा’, असे कॅप्शन देत त्याने हा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो मला ‘कुमकुम भाग्य’च्या सेटवर घेऊन गेला, खूप आठवण येईल, असे म्हणत त्याने आपले दुःख व्यक्त केले आहे. जरीन यांनी मलिकेत ‘अभि’च्या आजीची भूमिका केली होती. (Kumkum Bhagya Indu Dadi fame actress Zarina Roshan Khan Passed away)

View this post on Instagram

Ye chand sa Roshan Chehera 💔

A post shared by Shabir Ahluwalia (@shabirahluwalia) on

श्रिति झाने व्यक्त केले दुःख

मालिकेत ‘प्रज्ञा’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रिति झाने देखील जरीन खान यांचा सेटवरील एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांच्या सोबतचा फोटो शेअर करत श्रितिने शोक व्यक्त केला आहे.

View this post on Instagram

💔…

A post shared by Sriti Jha (@itisriti) on

मालिका विश्वावर शोककळा

अभिनेत्री जरीना रोशन खान (Actress Zarina Roshan Khan) यांनी स्टार प्लसच्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतही महत्त्वाची भूमिका साकारली होती. ‘कुमकुम भाग्य’ ही त्यांची शेवटची मालिका ठरली आहे. या आधीही त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले होते. मात्र, ‘कुमकुम भाग्य’च्या ‘इंदू दादी’ने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली होती. मालिकेच्या या पात्राने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.

(Kumkum Bhagya Indu Dadi fame actress Zarina Roshan Khan Passed away)

Published On - 10:52 am, Mon, 19 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI