टाटा आमंत्रा कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांच्या जेवणात अळ्या, केडीएमसीचा भोंगळपणा चव्हाट्यावर

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या टाटा आमंत्रा या कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांना देण्यात आलेल्या जेवणात अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Larvae in food of corona patients in Kalyan).

टाटा आमंत्रा कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांच्या जेवणात अळ्या, केडीएमसीचा भोंगळपणा चव्हाट्यावर

ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या टाटा आमंत्रा या कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांना देण्यात आलेल्या जेवणात अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णांनी याबाबत कोव्हिड सेंटरमधील महापालिका अधिकाऱ्यांना माहिती दिली. रुग्णांनी हा सगळा प्रकार अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. मात्र, त्यावर अधिकाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे (Larvae in food of corona patients in Kalyan).

टाटा आमंत्रा कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांना निकृष्ट जेवण दिलं जात असल्याचा आरोप याआधीदेखील करण्यात आला आहे. मात्र, महापालिका प्रशासनाला तरीदेखील जाग येताना दिसत नाही. अशा प्रकारच्या घटना वारंवार समोर आल्याने महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे (Larvae in food of corona patients in Kalyan).

कल्याण-डोंबिवलीत दररोज जवळपास 500 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. कोरोनामुळे नागरिक धास्तावलेले असताना महापालिकेच्या कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांना देण्यात येणारं जेवणदेखील निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे महापालिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी उद्योगपती रतन टाटा यांनी कल्याणच्या भिवंडी बायपास रोडजवळ असलेले टाटा आमंत्रा हे भव्य संकुल रुग्णसेवेसाठी मदत म्हणून राज्य सरकारच्या स्वाधीन केलं. रुग्णांसाठी भव्य 20 मजली इमारतींचे संकुल मोफत उपलब्ध झाल्यानंतरही केडीएमसीकडून रुग्णांसाठी फक्त चांगल्या दर्जाचं अन्न पुरवलं जाऊ शकत नाही? असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा :

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनाने निधन

‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI