AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अफवा पसरवणारे मूर्खपणा करत आहेत : लता मंगेशकर

मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती बिघडल्याचे अनेक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र आपली प्रकृती उत्तम असून मी घरीच आहे आणि ठणठणीत आहे, असं खुद्द लता मंगेशकर यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितलं. अनेक दिवसांपासून लता मंगेशकर यांची प्रकृती बिघडल्याचे मेसेज फिरत आहेत. त्यातच आज त्यांना त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही मेसेज फॉरवर्ड […]

अफवा पसरवणारे मूर्खपणा करत आहेत : लता मंगेशकर
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jul 05, 2019 | 4:50 PM
Share

मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती बिघडल्याचे अनेक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र आपली प्रकृती उत्तम असून मी घरीच आहे आणि ठणठणीत आहे, असं खुद्द लता मंगेशकर यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितलं. अनेक दिवसांपासून लता मंगेशकर यांची प्रकृती बिघडल्याचे मेसेज फिरत आहेत. त्यातच आज त्यांना त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही मेसेज फॉरवर्ड होत आहेत. मात्र लतादीदींनी आपली प्रकृती उत्तम असल्याचं सांगितलं.

माझ्या प्रकृतीबाबतच्या चर्चा या निव्वळ अफवा आहेत, त्यावर विश्वास ठेऊ नका, असं लता मंगेशकर यांनी टीव्ही 9 ला सांगितलं.

लतादीदी म्हणाल्या , “माझी प्रकृती चांगली आहे, ठणठणीत आहे, घरी बसलेय. माझी प्रकृती छान आहे, मी काही आजारी नाही. मला या अफवांचं वाईट वाटत नाही, कारण याआधी पण अशा अफवा उठल्या. अफवा पसरवणारे काहीतरी आचरटपणा करत असतात. त्यांना हे करण्यात मजा येते. एक बातमी उडवली आणि सगळ्यांना हलवून सोडलं, असं त्यांना वाटतं. पण त्यांना हे कळत नाही की आपण मूर्खपणा करतोय. अशा अफवा उठतात तेव्हा चाहत्यांना वाईट वाटतं आणि त्यांना वाईट वाटावं म्हणूनच अशा अफवा उठवल्या जातात. पण अफवा उठवणाऱ्यांना हे कळत नाही की, असं जर त्यांच्या बाबतीत झालं तर काय होईल.”

“माझ्या प्रकृतीबाबत काही अफवा पसरत आहेत. पण तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका, माझी प्रकृती ठीक असून मी माझ्या घरी आहे.” असे ट्वीट लता मंगेशकर यांनी केले.

याआधी लता मंगेशकर या गाणं सोडणार आहेत अशी अफवा पसरवण्यात आली होती, पण मी शेवटच्या श्वासापर्यंत गाणं सोडणार नाही असे लता दीदींनी सांगितले होते.

Follow Us
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ