कोरोनामुक्त झालेल्या लातूरमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, गुजरातहून लिफ्ट घेत आलेल्या महिलेला कोरोना

| Updated on: Apr 25, 2020 | 4:52 PM

अवघ्या चार दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या लातुरात कोरोनाने पुन्हा प्रवेश केला (Latur Corona Virus Update) आहे.

कोरोनामुक्त झालेल्या लातूरमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, गुजरातहून लिफ्ट घेत आलेल्या महिलेला कोरोना
Follow us on

लातूर : राज्यात कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला (Latur Corona Virus Update) आहे. राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे अनेक जिल्हे कोरोनामुक्त होत आहेत. अवघ्या चार दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या लातुरात कोरोनाने पुन्हा प्रवेश केला आहे. गुजरातहून लातूरच्या उदगीरमध्ये आलेल्या एक महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात (Latur Corona Virus Update) आले आहे. मात्र तरीही या महिलेने गुजरात ते लातूर असा प्रवास केला. विशेष म्हणजे गुजरातहून लातूरात येताना तिने अनेक वाहनांची मदत घेतली. तसेच उदगीर आल्यानंतर या महिलेने कोणत्याही प्रकारची तपासणी केली नाही. तसेच प्रवास केल्याची माहितीही लपवली.

मात्र प्रशासनाने या महिलेला शोधून काढत तिची तपासणी केली. त्यावेळी या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं. या महिलेवर उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान चार दिवसांपूर्वी ऑरेंज झोनमधून ग्रीन झोनमध्ये आलेला लातूर जिल्ह्यात अजून एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता हा रुग्ण पुन्हा ऑरेंज झोनमध्ये आला आहे.

राज्यातील स्थिती काय?

महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6 हजार 817 वर पोहचली आहे. काल (24 एप्रिल) दिवसभरात एकूण 394 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 117 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत राज्यभरात 957 रुग्ण बरे झाले आहेत. तर, एकूण 5 हजार 559 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपर्यंत महाराष्ट्रात 1 लाख 2 हजार 189 कोरोना चाचण्या झाल्या. यापैकी 94 हजार 485 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले, तर 6 हजार 817 जण पॉझिटिव्ह आले (Latur Corona Virus Update) आहेत.

संबंधित बातम्या : 

पुण्याची धाकधूक वाढली, दोन दिवसात 208 नवे कोरोना रुग्ण आणि 8 मृत्यू

वाशिम जिल्हा कोरोनामुक्त, जिल्ह्यातील एकमेव रुग्ण कोरोना निगेटिव्ह