वकिलाचा वकिलावर कुऱ्हाडीने हल्ला, स्वतः विष पिऊन आत्महत्या

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपुरात सदानंद नारनवरे नावाच्या वकिलावर वकिलानेच कुऱ्हाडीने हल्ला चढवला आणि स्वतः विष पिऊन आत्महत्या केली. हा हल्ला वैयक्तिक कारणातून केल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी यावर अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसून पुढील तपास सुरु आहे. शुक्रवारी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास सदानंद नारनवरे हे वकील आपलं काम कोर्टाच्या बाहेर आटोपून निघण्याच्या […]

वकिलाचा वकिलावर कुऱ्हाडीने हल्ला, स्वतः विष पिऊन आत्महत्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपुरात सदानंद नारनवरे नावाच्या वकिलावर वकिलानेच कुऱ्हाडीने हल्ला चढवला आणि स्वतः विष पिऊन आत्महत्या केली. हा हल्ला वैयक्तिक कारणातून केल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी यावर अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसून पुढील तपास सुरु आहे.

शुक्रवारी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास सदानंद नारनवरे हे वकील आपलं काम कोर्टाच्या बाहेर आटोपून निघण्याच्या तयारीत होते. त्या ठिकाणी अचानकपणे आरोपी लोकेश भास्कर पोहोचला. काही कारणावरून दोघात वाद झाला आणि आरोपीने स्वतः जवळ असलेल्या कुऱ्हाडीने जोरदार हल्ला केला.

या हल्ल्यात वकील सदानंद हे गंभीर जखमी झाले, तर आरोपीनेही त्याच ठिकाणी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला रुग्णालयात नेलं, मात्र त्या ठिकाणी आरोपी लोकेश भास्करचा मृत्यू झाला. या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

कोर्ट सुटायचा वेळ असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वकिलांचा गराडा जमला होता. पोलिसांनी हल्ला झालेल्या वकिलाला रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असून त्यांची स्थिती गंभीर आहे.

या हल्ल्यामागचं कारण नेमकं काय याचा तपास पोलीस करतीलच. मात्र आरोपी ज्या प्रकारे या ठिकाणी तयारीने पोहोचला त्यावरून त्याने याचं प्लॅनिंग करूनच केलं असल्याचं दिसतं. कारण तो सोबत कुऱ्हाड घेऊन आला. सोबतच स्वतः आत्महत्या करण्याचाही त्याचा निर्धार होता. त्यामुळे त्याने विषाची बॉटलही सोबत आणली आणि ती पिऊन घेतली.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.