पाणी पिताना नाकात जळू शिरला, तब्बल 25 दिवस समजलंच नाही, डॉक्टरांनी भन्नाट आयडिया करुन बाहेर काढला!

| Updated on: May 30, 2020 | 9:29 PM

पाणी पिताना नाकात जळू शिरला, मात्र त्याची भनकही न लागलेल्या तरुणाच्या नाकातून हा जळू जवळपास महिनाभराने काढण्यात आला.

पाणी पिताना नाकात जळू शिरला, तब्बल 25 दिवस समजलंच नाही, डॉक्टरांनी भन्नाट आयडिया करुन बाहेर काढला!
Follow us on

सिंधुदुर्ग : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना तिकडे सिंधुदुर्गात (Leech Entered In Man’s Nose) आश्चर्यकारक घटना घडली आहे. पाणी पिताना नाकात जळू शिरला, मात्र त्याची भनकही न लागलेल्या तरुणाच्या नाकातून हा जळू जवळपास महिनाभराने काढण्यात आला. तब्बल 25 दिवस हा जळू नाकात आहे तसाच होता. डॉक्टरांनी मोठ्या शिताफीने तो बाहेर काढून, तरुणाला मोठ्या संकटातून (Leech Entered In Man’s Nose) वाचवलं.

कणकवली तालुक्यातील ढिगवळे या गावातील शुभम परब याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली. लॉकडाऊन आणि सुट्ट्यांमुळे दिवसभर खेळण्या बागडण्यात त्याचा वेळ जातो. शुभम दररोज घरालगतच्या जंगलात फेरफटका मारतो.

एक दिवस जंगलातच पाणवठ्यावर हाताच्या पोशाने पाणी पित असताना, एक जळू त्याच्या नाकात शिरला. शुभमला आपल्या नाकात जळू शिरलाय हे जराही जाणवलं नाही. काही दिवसानंतर म्हणजे जवळजवळ 25 दिवसानंतर शुभमच्या नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला. सुरुवातीला तो उष्णतेने किंवा इतर कारणाने होत असेल असं कुटुंबीयांना वाटलं. मात्र, एके दिवशी रात्री हा जळू नाकातून थोडा बाहेर आला आणि शुभमला आपल्या नाकात काहीतरी असल्याचं जाणवलं (Leech Entered In Man’s Nose).

डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरांच्या चाणाक्ष नजरेने जळूला हेरलं. त्याला नाकातून बाहेर काढण्याचे अनेक प्रयत्न केले गेले. परंतु उपयोग झाला नाही. अखेर एक दिवस शुभमच डॉक्टरांना म्हणाला की, हा जळू रात्री झोपल्यावर बाहेर येत असल्याची जाणीव झाली. त्यानंतर मग डॉक्टरांनी शक्कल लढवली. आपल्या दवाखान्यातील सर्व लाईट्स, फॅन बंद करुन अंधार केला.

या अंधाराबरोबरच शांतताही पाळण्यात आली. तब्बल 40 मिनिटे वाट पाहिल्यांनतर त्या जळूने शेपटीच्या भागाकडून थोडेसे बाहेर येण्याचा प्रयत्न करताच, डॉक्टरांनी लागलीच चिमट्याच्या सहाय्याने पकडून त्या जळूला बाहेर काढलं. नाकात तब्बल एक महिन्याचा ‘लॉकडाऊन’ पूर्ण करुन कोणतीही इजा न करता हा जळू बाहेर आला. बाहेर सरकणारा तो जळू 3 ते 4 इंच लांब होता. ओढून काढताना त्याची लांबी 7 ते 8 इंच होती.

डॉक्टर पराग मुंडले यांनी शक्कल लढवून त्या युवकाची जीवघेण्या प्रसंगातून सुटका केली. तो जळू घशात किंवा वरती सरकला असता तर बाका प्रसंग निर्माण झाला असता. त्या जळूने निपचित पडून महिनाभर नाकातच राहिला. मात्र, त्याचा थांगपत्ता तब्बल 25 दिवस शुभमला लागलाच (Leech Entered In Man’s Nose) नाही हे नवल.

संबंधित बातम्या :

जुळ्या बाळांना जन्म देऊन कोरोनाबाधित मातेचं निधन, बाळांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा

चंद्रपुरात क्वारंटाईन सेंटरमधील दोघांचा मृत्यू, एकाचा गळफास, तर दुसऱ्याचा हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू

Lockdown Effect | इतिहासात पहिल्यांदाच उन्हाळ्यात नागपूरच्या रस्त्यांवर शीतपेयांची दुकानं नाही

कुटुंबीय क्वारंटाईन, कोल्हापुरात कोरोनाग्रस्त बालिकेला महिला तहसीलदाराकडून मायेची ऊब