AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lockdown Effect | इतिहासात पहिल्यांदाच उन्हाळ्यात नागपूरच्या रस्त्यांवर शीतपेयांची दुकानं नाही

नागपूरात सूर्य देवता आग ओकत आहेत. मात्र, यापासून दिलासा देणारी शीतपेयांची दुकानं यंदा नागपुरात कुठेही दिसत नाहीत.

Lockdown Effect | इतिहासात पहिल्यांदाच उन्हाळ्यात नागपूरच्या रस्त्यांवर शीतपेयांची दुकानं नाही
| Updated on: May 29, 2020 | 6:47 PM
Share

नागपूर : नागपुरात सूर्य देवता आग ओकत (Nagpur Soft Drinks Shops Closed) आहेत. मात्र, यापासून दिलासा देणारी शीतपेयांची दुकानं यंदा नागपुरात कुठेही दिसत नाहीत. इतिहासात पहिल्यांदाच उन्हाळ्यात नागपूरच्या रस्त्यांवर सजलेली शीतपेयांची दुकानं (Nagpur Soft Drinks Shops Closed) नाहीत.

नागपुरात दरवर्षी उन्हाचे चटके लागायला सुरवात झाली की, रस्त्याच्या कडेला ठिक-ठिकाणी शीत पेयांची दुकानं सजलेली दिसतात. कुठे लिंबू पाणी, कुठे फळाचा ज्यूस तर कुठे ऊसाच्या रसाची गाडी असते. हीच दुकानं उन्हाळ्यात नागपूरची ओळख बनतात. ही दुकानं उन्हापासून नागपूरकरांना दिलासा देतात.

मात्र, कोरोनाने असा कहर केला की, उन्हाचे चटके तर कायम आहे, मात्र त्यापासून दिलासा देणारं शीतपेय नाही. नागपुरातील तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. या तापमानात घराबाहेर निघताच शरीराची लाही लाही होते. या परिस्थितीत ही शीतपेयांची दुकानं नागपूरकरांना आधार देतात. मात्र, लॉकडाऊनमुळे सध्या नागपुरात कुठलंही दुकान नजरेस पडत नाही (Nagpur Soft Drinks Shops Closed). ऊसाचा रस, लिंबू पाणी पिणे उन्हाळ्यात शरीरासाठी गुणकारी असते. मात्र, रस्त्यावर शीतपेयांची दुकानंच नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

नागपूरच्या उन्हात शरीराला थंडावा देण्याचं काम उसाचा रस करत असते. लिंबू पाणी उष्माघातापासून वाचविण्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे सध्या शीतपेयांची दुकानंही बंद आहेत. त्यामुळे अनेकांचे व्यवसायही पणाला लागले आहेत.

नागपुरात कोरोनाची स्थिती काय?

नागपुरात आज कोरोनाचे 11 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 465 वर पोहोचली आहे. नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. तसेच, त्यांनी नागपुरात अनेक कडक नियमही लागू केले आहेत.

Nagpur Soft Drinks Shops Closed

संबंधित बातम्या :

नागपूरकरांना दिलासा, हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुऱ्यातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त!

राज्य सरकारचं मुख्यालय नागपुरात शिफ्ट करा : काँग्रेस नेते आशिष देशमुख

कोरोनामुळे मलाही सोडलंय, नागपूर जेलमधून पळून गेलेला कैदी दिल्लीत बहिणीच्या घरी सापडला

नागपुरात सव्वा महिन्यातील मद्यविक्रीचा महसूल अवघ्या 11 दिवसात

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.