भारतीय वंशाच्या ‘या’ 7 CEO चा जगभरात डंका

| Updated on: Jun 13, 2019 | 5:45 PM

जगभरात भारतीयांनी आपल्या मेहनतीच्या बळावर वेगवेगळ्या क्षेत्रात आपले स्थान निश्चित करत छाप सोडली आहे. यात गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुंदर पिचाई यांच्यापासून अनेकांचा समावेश आहे.

भारतीय वंशाच्या या 7 CEO चा जगभरात डंका
Follow us on

मुंबई : जगभरात भारतीयांनी आपल्या मेहनतीच्या बळावर वेगवेगळ्या क्षेत्रात आपले स्थान निश्चित करत छाप सोडली आहे. यात गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुंदर पिचाई यांच्यापासून अनेकांचा समावेश आहे. त्यांनी आपल्या कामाने जगभरात प्रभाव पाडला असून त्यांची मोठी चर्चा होते. यात आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. ते नाव आहे लक्ष्मण नरसिम्हन.

रेकिट बेनकाजरने (Reckitt Benckiser) भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिम्हन यांना आपला ‘ग्लोबल सीईओ’ म्हणून नियुक्त केले आहे. ते लक्ष्मण राकेश कपूर यांची जागा घेतील. नरसिम्हन यांनी पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी अमेरिकेच्या वॉर्टन स्कूलमधून फायनान्समध्ये एमबीए केले आहे.

सुंदर पिचाई जगातील सर्वात मोठी इंटरनेट कंपनी गुगलचे (Google) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. भारतात जन्म झालेल्या सुंदर पिचाई यांनी 2004 मध्ये गुगलमध्ये कामाला सुरुवात केली होती. अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमची डेव्हलपमेंट आणि 2008 मध्ये लाँच झालेल्या गुगल क्रोममध्ये त्यांची मोठी भूमिका राहिली आहे.

सत्या नडेला 2014 मध्ये अमेरिकेची कंपनी मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) सीईओ झाले. सत्‍या यांच्याकडे मनिपल इंस्‍टीट्यूट ऑफ टेक्‍नोलॉजीची इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंगची बॅचलर ऑफ इंजीनिअरिंगची डिग्री आहे. यानंतर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. नडेला 1992 मध्ये मायक्रोसॉफ्टसोबत जोडले गेले. त्याआधी त्यांनी सन मायक्रोसिस्टम्ससाठी काम केले होते.

शंतनु नारायण 2007 मध्ये अॅडोबचे (Adobe) सीईओ झाले. त्यांच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात कंपनीने अनेक गोष्टींमध्ये यश मिळवले. 19 नोव्हेंबर 2007 ला कंपनीची मार्केट कॅप 25.09 बिलियन डॉलर होती. एप्रिल 2019 मध्ये ती वाढून 141.13 बिलियन डॉलर झाली.

भारतीय वंशाचे निकेश अरोरा पॉलो अल्टो नेटवर्क्सचे (Palo Alto Networks) सीईओ आहेत. निकेश जगभरात सर्वाधिक वेगाने पगार वाढणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ते 1 जून 2018 ला पॉलो अल्टो नेटवर्क्सचे सीईओ झाले होते.

भारतीय वंशाचे राजीव सूरी फिनलँडच्या दूरसंचार उपकरणे बनवणाऱ्या नोकिया (Nokia) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. राजीव सूरी आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला दोघांनीही मंगळुरच्या विश्वविद्यालयात शिक्षण घेतले आहे. राजीव यांचे वार्षिक उत्पन्न 1.25 मिलियन यूरो आहे.

अजयपाल सिंह बंगा जगातील प्रमुख क्रेडिट कार्ड कंपनी मास्टरकार्डचे (MaterCard) सीईओ आहेत. हार्वर्ड बिजनेस रिव्यू मॅगजीन जगभरातील सर्वश्रेष्ठ 100 सीईओंची यादी याहीर करते. त्यांच्या 2014 च्या यादीत बंगा यांचाही समावेश राहिलेला आहे. त्यांचा वार्षिक पगार 12.4 मिलियन डॉलरच्या आसपास आहे.

संबंधित बातम्या:

फोर्ब्स इंडिया मॅगजीनच्या कव्हर पेजवर रोहित शर्माचा फोटो

श्रीमंत खेळाडूंमध्ये विराट एकमेव क्रिकेटर, वर्षाची कमाई तब्बल….

Archived: दानशूर अझीम प्रेमजी! 52 हजार कोटींहून अधिक रक्कम गरिबांसाठी दान

Archived: श्रीमंतांच्या यादीत अनिल अंबानी 1349 व्या क्रमांकावर, मुकेश अंबानी किती?