फोर्ब्स इंडिया मॅगजीनच्या कव्हर पेजवर रोहित शर्माचा फोटो

फोर्ब्स इंडिया मॅगजीनच्या कव्हर पेजवर रोहित शर्माचा फोटो

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा उप कर्णधार रोहित शर्मा सध्या प्रत्येक क्रिकेट चाहत्यांचा आवडता खेळाडू ठरला आहे. दिवसेंदिवस रोहित शर्माची क्रेझही क्रिकेट चाहत्यांमध्ये वाढत आहे. जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या यादीत रोहित शर्माचा समावेश होतो. ओडीआय क्रिकेट सामन्यात तीनवेळा दुहेरी शतक करणारा एकमेव खेळाडू म्हणून रोहित शर्माची ओळख आहे. नुकतेच रोहित आयपीएल क्रिकेट सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा […]

सचिन पाटील

| Edited By:

May 26, 2019 | 11:16 AM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा उप कर्णधार रोहित शर्मा सध्या प्रत्येक क्रिकेट चाहत्यांचा आवडता खेळाडू ठरला आहे. दिवसेंदिवस रोहित शर्माची क्रेझही क्रिकेट चाहत्यांमध्ये वाढत आहे. जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या यादीत रोहित शर्माचा समावेश होतो. ओडीआय क्रिकेट सामन्यात तीनवेळा दुहेरी शतक करणारा एकमेव खेळाडू म्हणून रोहित शर्माची ओळख आहे.

नुकतेच रोहित आयपीएल क्रिकेट सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार पदी होता आणि त्याने आपल्या नेतृत्वात मुंबई संघाला चौथ्यांदा जेतेपद मिळवून दिले. यापूर्वीही 2013, 2015, 2017 आणि यंदा 2019 मध्येही रोहितने आपल्या संघाला आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले. चारवेळा आयपीएल जेतेपद मिळवून देणारा रोहित एकमेव क्रिकेटर आहे. या सर्व गोष्टी पाहून फोर्ब्स इंडियाने आपल्या स्पोर्टस आवृत्तीच्या कव्हर पेजवर रोहित शर्माला जागा दिली आहे.

फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, कव्हर स्टोरी भारताचा उपकर्णधार रोहित शर्माची असेल. रोहितने फोर्ब्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या क्रिकेट आणि कर्णधार पदापर्यंतच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याने भारतीय संघातील त्याच्या कामगिरीवरही सांगितले आहे. याशिवाय मॅगजीनच्या एका आवृत्तीमध्ये कबड्डी लीग आणि देशात त्याच्या वाढत्या क्रेझवरही लेख छापण्यात आला आहे. तसेच UEFA चॅम्पियन्स लीग आणि युरोप लीगवरही लेख छापण्यात आला आहे.

रोहित म्हणाला, “तुमचे चांगले आणि वाईट हे दोन्ही दिवस येणार. तुमचा प्रवास नेहमी चांगला असू शकत नाही. नेहमी सुंतलीत राहा आणि पुढे जा”.

मॅगजीनच्या विशेष आवृत्तीच्या कव्हर स्टोरीची हेडलाई ‘ROHIT HIT HOORAY’ अशी आहे. सध्या आयसीसी वर्ल्डकपसाठी रोहित शर्मा तयारी करत आहे.

दरम्यान, आयपीएल क्रिकेट वर्ल्डकपचे आयोजन 30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु होत आहे. भारतीय क्रिकेट संघ आपला पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण अफ्रिकेत खेळणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें