Nobel Prize in Physics | 1901 पासून आतापर्यंत भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळणाऱ्या 4 महिला संशोधक

| Updated on: Oct 06, 2020 | 5:29 PM

अँड्री गेझ भौतिकशास्त्रातील पुरस्कार मिळणाऱ्या चौथ्या महिला पुरस्कार्थी ठरल्या आहेत. याआधी नोबेल पुरस्कार वितरण सुरु झालं तेव्हापासून केवळ 3 महिला संशोधकांनाच हा पुरस्कार मिळाला आहे.

Nobel Prize in Physics | 1901 पासून आतापर्यंत भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळणाऱ्या 4 महिला संशोधक
Follow us on

स्टॉकहोम : रॉयल स्विडीश अकॅडमीने यंदाचं भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर केला आहे (Nobel Prize in Physics). हा पुरस्कार संशोधक रॉजर पेनरोज यांच्यासह रेनहार्ड गेनझेल आणि अँड्री गेझ यांना संयुक्तपणे विभागून देण्यात आला आहे. यासह अँड्री गेझ भौतिकशास्त्रातील पुरस्कार मिळणाऱ्या चौथ्या महिला पुरस्कार्थी ठरल्या आहेत. याआधी नोबेल पुरस्कार वितरण सुरु झालं तेव्हापासून केवळ 3 महिला संशोधकांनाच हा पुरस्कार मिळाला आहे. आता अँड्री चौथ्या सन्मानार्थी ठरल्या (List of Physics Nobel prize winner women researcher).

रॉजर पेनरोज यांना ब्लॅक होलवरील संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. रेनहार्ड आणि अँड्री यांना आकाशगंगेतील संशोधनासाठी सन्मानित करण्यात आले. संशोधक रॉजर पेनरोज यांनी ब्लॅक होल तयार होण्याची प्रक्रिया आणि सापेक्षतावादाचा सिद्धांत यांचा संबंध जोडणारं संशोधन केलं आहे. तर रेनहार्ड गेनझेल आणि अँड्री गेझ यांनी आकाशगंगेच्या मध्यभागी सुपरमॅसिव्ह कॉम्पॅक्ट ऑब्जेक्टचा शोध लावला आहे.

आतापर्यंत फिजिक्समध्ये केवळ 3 महिलांना नोबेल पुरस्कार, अँड्री गेझ चौथ्या पुरस्कार्थी

1922 मध्ये अल्बर्ट आईनस्टाईन यांना आणि 1919 मध्ये जर्मन भौतिक शास्त्रज्ञ मॅक्स प्लँक यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला. त्यांनी क्वांटम थेअरीचा पाया रचला होता. आतापर्यंत 52 वेळा महिलांना नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. 1901 पासून 2018 पर्यंत 52 वेळा महिलांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मेरी क्यूरी यांना दोनदा हा पुरस्कार देण्यात आला होता. याआधी फिजिक्समध्ये केवळ 3 महिलांना हा पुरस्कार मिळाला होता, आता अँड्री यांच्या पुरस्काराने हा आकडा चारपर्यंत गेला आहे.

1901 मध्ये पहिल्यांदा फिजिक्समधील नोबेल पुरस्कार घोषित

फिजिक्समधील नोबेल पुरस्कार 1901 मध्ये पहिल्यांदा जर्मन संशोधक विल्हेम रोंटजेन यांना एक्स-रेचा शोध लावण्यासाठी देण्यात आला होता. 1916, 1931, 1934 आणि 1940 मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 6 वर्ष फिजिक्समधील नोबेल पुरस्कार कुणालाही देण्यात आला नव्हता. महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर नोबेल फाऊंडेशनच्या नियमांनुसार हा निर्णय घेण्यात आला होता. या नियमानुसार ज्यावर्षी या पुरस्काराला योग्य व्यक्ती सापडणार नाही त्यावर्षी त्या पुरस्काराची रक्कम नोबेल फाऊंडेशनच्या प्रतिबंधित निधीत जमा करायची असते.

1901 पासून आतापर्यंत जवळपास 212 जणांना 113 वेळा हा पुरस्कार देण्यात आला आहे. जॉन बार्डीन यांना हा पुरस्कार ट्रांजिस्टरच्या शोधासाठी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कामामुळे त्यांना हा पुरस्कार दोनदा मिळाला आहे. एक नोबेल पुरस्कार (Nobel Prize) अधिकाधिक 3 जणांना 2 वेगवेगळ्या कामांसाठी देता येतो.

संबंधित बातम्या :

Nobel Prize in Physics| रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल आणि एन्ड्रिया गेज यांना भौतिकशास्त्राचे नोबेल

Nobel Prize | यंदाचा नोबेल पुरस्कार ‘हेपेटायटिस-सी’ विषाणूचा शोध लावणाऱ्या 3 संशोधकांना

List of Physics Nobel prize winner women researcher