Nobel Prize | यंदाचा नोबेल पुरस्कार ‘हेपेटायटिस-सी’ विषाणूचा शोध लावणाऱ्या 3 संशोधकांना

यंदाचा नोबेल पुरस्कार कॅन्सर आणि सिरोसिसचा कारणीभूत ठरणाऱ्या हेपेटायसिस सी (Hepatitis C) या विषाणूचा शोध लावण्यासाठी देण्यात आला.

Nobel Prize | यंदाचा नोबेल पुरस्कार ‘हेपेटायटिस-सी’ विषाणूचा शोध लावणाऱ्या 3 संशोधकांना
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Oct 05, 2020 | 8:57 PM

स्टॉकहोम : जगप्रसिद्ध नोबेल पुरस्कारांची घोषणा झाली आहे. 2020 च्या वैद्यकीय विभागातील नोबेल पुरस्कार (Nobel Prize) अमेरिकेचे हार्वे जे अल्टर, चार्ल्स एम राईस आणि ब्रिटिश संशोधक मायकल ह्यूटन यांना देण्यात आला आहे ( Hepatitis C researcher get Nobel Prize 2020). या तिघांनाही कॅन्सर आणि सिरोसिसचा कारणीभूत ठरणाऱ्या हेपेटायसिस सी (Hepatitis C) या विषाणूचा शोध लावण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला. नोबेल पुरस्कार समितीचे प्रमुख थॉमस पर्लमॅन यांनी स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे या पुरस्कारांची घोषणा केली.

नोबेल पुरस्कार समितीने दिलेल्या माहितीनुसार, रक्तातील हेपेटायटिस सी हा विषाणू जगभरात सिरोसिस आणि यकृताचा कर्करोग (कॅन्सर) होण्यास कारणीभूत ठरतो. या आजारांविरोधातील लढाईत या तिनही संशोधकांच्या संशोधनाचा मोठा उपयोग होणार आहे. त्यांच्या या विशेष योगदानासाठीच त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगभरात हेपेटायटिसचे 7 कोटीपेक्षा अधिक रुग्ण आहेत. या आजारांमुळे जगभरात दरवर्षी जवळपास 4 लाख रुग्णांचा मृत्यू होतो.

नोबेल पुरस्कार का देण्यात येतो?

नोबेल पुरस्कार स्वीडनचे संशोधक अल्फ्रेड बनार्ड नोबेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येतात. अल्फ्रेड यांनी मृत्यूआधी आपल्या संपत्तीतील मोठा वाटा नोबेल ट्रस्टला दिला. त्याच पैशातून मानवी हितासाठी काम करणाऱ्यांना हा पुरस्कार द्यावा असा त्यांचा उद्देश होता. पहिला नोबेल शांती पुरस्कार 1901 मध्ये देण्यात आला होता. नोबेल पुरस्कार भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र, साहित्य, अर्थशास्त्र आणि शांतीच्या क्षेत्रासाठी देण्यात येतो.

पुरस्काराचं स्वरुप एक मेडल आणि 1 कोटी स्वीडिश क्रोना म्हणजेच जवळपास 8 कोटी रुपये मिळणार आहेत. जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाचं संकट असताना यावेळचा नोबेल पुरस्कार वैद्यकीय क्षेत्राला मिळण्याचं महत्त्व वेगळं आहे.

संबंधित बातम्या :

भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जींसह पत्नीला नोबेल पुरस्कार

आफ्रिका खंडातील सर्वात तरुण नेतृत्त्वाला शांततेचं नोबेल

मोबाईलची बॅटरी बनवणाऱ्या तीन शास्त्रज्ञांचा नोबेलने सन्मान

Hepatitis C researcher get Nobel Prize 2020

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें