Nobel Prize in Physics| रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल आणि एन्ड्रिया गेज यांना भौतिकशास्त्राचे नोबेल

भौतिकशास्रात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलंय. रॉजर पेनरोज , रेनहार्ड गेंजेल,  एन्ड्रिया गेज या 3 शास्रज्ञांचा या पुरस्कारानं गौरव करण्यात आलाय.

Nobel Prize in Physics| रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल आणि एन्ड्रिया गेज यांना भौतिकशास्त्राचे नोबेल
Yuvraj Jadhav

|

Oct 06, 2020 | 5:36 PM

स्टॉकहोम: जगातला सर्वात श्रेष्ठ मानला जाणारा भौतिक शास्रातील नोबेल पुरस्कार यंदा 3 शास्रज्ञांना विभागून देण्यात आला आहे. भौतिकशास्रात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलंय. रॉजर पेनरोज , रेनहार्ड गेंजेल,  एन्ड्रिया गेज या 3 शास्रज्ञांचा या पुरस्कारानं गौरव करण्यात आलाय. (Roger Penrose, Reinhard Genze Andrea Ghez got Nobel Prize in Physics 2020)

ब्लॅक होल फॉर्मेशनला भौतिकशास्राच्या जनरल थिअरी ऑफ रिलेटीविटीशी जोडण्याचं काम रॉजर पेनरोज यांनी केलं.  तर रेनहार्ड आणि एन्ड्रिया या दोन्ही शास्रज्ञांनी आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या अतिविशाल ब्लॅकहोल शोधून काढला. त्यांचं हे काम अंतराळ संशोधनात अतिशय मोलाचं आहे. त्यामुळंच त्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या तिघांनाही 11 लाख डॉलरच्या रकमेसह सुवर्णपदक दिलं जाणार आहे.

भौतिकशास्त्राचा 2020 चा नोबेल रॉजर पेनरोझ आणि रेनहार्ड गेंजेल,  एन्ड्रिया गेजना संयुक्तपणे देण्यात आला आहे. स्वीडनच्या स्टॉकहोममधून आज या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

रॉजर पेनरोझ यांनी इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठातून 1957 ला डॉक्टरेट मिळवली आहे. पेनरोझ सध्या ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ब्लॅकहोल फॉर्मेशनला आईनस्टाईनच्या जनरल थेअरी ऑफ रिलेटीविटीशी जोडले. ब्लॅकहोल संदर्भातील पेनरोझ यांचा शोधनिबंध प्रसिद्ध आहे.

रेनहार्ड गेंजेल यांनी जर्मनीतील बोन विद्यापीठातून 1978 डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे. गेंजेल अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करतात. एन्ड्रिया गेज यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया इनस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथून पीएच.डी. पदवी मिळवली असून त्यादेखील कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करतात.  गेंजेल आणि गेज यांची संस्था 1990 पासून ब्लॅकहोल संदर्भात संशोधन करत आहे.

मागील वर्षी भौतिकशास्रातील नोबेल हा कॅनाडामधील शास्रज्ञ जेम्स पीबल्स यांना देण्यात आला होता. त्यांनी बिगबँगनंतरच वेळेवर संशोधन केलं होतं. याशिवाय अंतराळवीर मिचेर मेयर आणि डिडियर कुएलोज यांना आपल्या अंतराळाबाहेरचा ग्रह शोधण्यासाठी सन्मानित करण्यात आलं होतं.

दरम्यान, 2020 च्या वैद्यकीय विभागातील नोबेल पुरस्कार (Nobel Prize) अमेरिकेचे हार्वे जे अल्टर, चार्ल्स एम राईस आणि ब्रिटिश संशोधक मायकल ह्यूटन यांना देण्यात आला आहे

संबंधित बातम्या :

Nobel Prize | यंदाचा नोबेल पुरस्कार ‘हेपेटायटिस-सी’ विषाणूचा शोध लावणाऱ्या 3 संशोधकांना

Roger Penrose, Reinhard Genze Andrea Ghez got Nobel Prize in Physics 2020

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें