Live Update : औरंगाबादेत डाळिंबं रस्त्यावर टाकून भाजपचं आंदोलन, डाळिंबावर रोग पडल्यामुळे अनुदानाची मागणी

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर

Live Update : औरंगाबादेत डाळिंबं रस्त्यावर टाकून भाजपचं आंदोलन, डाळिंबावर रोग पडल्यामुळे अनुदानाची मागणी


[svt-event title=”कोयना धरणाचे दरवाजे बंद, कोयना धरणात 95.79 टीएमसी पाणीसाठा” date=”24/08/2020,5:02PM” class=”svt-cd-green” ] कराड : कोयना धरणाचे दरवाजे बंद, पाऊस उघडल्याने कोयना धरणाच्या सहा वक्री दरवाज्यातून सुरु असणारा पाणी विसर्ग बंद, पाऊस वाढल्याने चार दिवसांपुर्वी दुसऱ्यांदा दरवाजे उघडले, धरणाच्या पायथा वीजगृहातून फक्त 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु, कोयना धरणात 95.79 टीएमसी पाणीसाठा [/svt-event]

[svt-event title=” औरंगाबादेत डाळिंबं रस्त्यावर टाकून भाजपचं आंदोलन, डाळिंबावर रोग पडल्यामुळे अनुदानाची मागणी ” date=”24/08/2020,12:12PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : डाळिंबं रस्त्यावर टाकून भाजपने केले आंदोलन, डाळिंबं रस्त्यावर टाकून भाजपने अडवला रस्ता, औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड इथे औरंगाबाद जालना महामार्ग अडवून आंदोलन, डाळिंबावर रोग पडल्यामुळे डाळिंबाला अनुदान देण्याची भाजपची मागणी, भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वात आंदोलन [/svt-event]

[svt-event title=”पुणे मनपासमोर आंदोलन करणारे ब्राम्हण महासंघाचे कार्यकर्त्ये पोलिसांच्या ताब्यात” date=”24/08/2020,12:12PM” class=”svt-cd-green” ] पुणे : महापालिकेसमोर आंदोलन करणारे ब्राम्हण महासंघाचे कार्यकर्त्ये पोलिसांच्या ताब्यात, आनंद दवे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेसमोर आंदोलन, यावेळी ब्राम्हण महासंघाने केला पालिका प्रशासनाचा निषेध [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात लॉकडाऊन लावण्याबाबत आज मुख्यमंत्र्यांशी बोलणार – विजय वडेट्टीवार” date=”24/08/2020,12:00 PM ” class=”svt-cd-green” ] नागपूर : कोरोनाच्या बाबतीत नागपुरातील परिस्थिती हाताबाहेर, काही दिवसांत नागपूरात रस्त्यावर लोकं मृतावस्थेत दिसतील, नागपुरात लॉकडाऊन लावण्याबाबत आज मुख्यमंत्र्यांशी बोलणार, नागपूरच्या महापौरांमुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्याचा आरोप, नागपुरात लॉकडाऊन लावण्यासाठी सरकार अनुकूल, कॅबीनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”बीड जिल्हा कारागृहातील 59 कैदी कोरोना पॉझिटिव्ह” date=”24/08/2020,10:32AM” class=”svt-cd-green” ] बीड : जिल्हा कारागृहातील 59 कैदी कोरोना पॉझिटिव्ह, कारागृह प्रशासन हादरले,234 जणांच्या अँटिजेन टेस्टमध्ये 59 कैदी बाधित, जिल्ह्यात बाधितांचा आकडा 4 हजाराच्या जवळ [/svt-event]

[svt-event title=”जायकवाडी धरणात तब्बल 78.81 टक्के पाणीसाठा” date=”24/08/2020,9:25AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : जायकवाडी धरणात तब्बल 78.81 टक्के पाणीसाठा, जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ, जायकवाडी धरणात 15, 299 क्यूसेक्सने आवक सुरु, मराठवाड्यासाठी संजीवनी ठरणारं जायकवाडी धरण भरु लागल्यामुळे दिलासा [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात सदर परिसरातील इमारत कोसळली, एकाचा मृत्यू” date=”24/08/2020,09:30AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपुरातील सदर परिसरात इमारत कोसळली, पहाटे 4.43 ला ही इमारत कोसळली, दुर्घटनेत एकाचा मृत्यू, चार जणांना रेस्क्यू करण्यात अग्निशामक विभागाला यश एका व्यक्तीची प्रकृत्ती गंभीर [/svt-event]

[svt-event title=”पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली, खडकवासला, पानशेतनंतर वरसगाव धरण 99 टक्के भरले” date=”24/08/2020,08:30AM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली, पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चार धरणांपैकी खडकवासला, पानशेतनंतर वरसगाव धरण 99 टक्के भरले, चार धरणांमध्ये 28.35 टीएमसी पाणीसाठा, टेमघर, वरसगाव, आणि पानशेत धरण परिसरात काल 10 मिलिमीटर पाऊस [/svt-event]

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI